फोंडा : सिमेपाईण - म्हार्दोळ भागात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दोन घरांवर भले मोठे झाड कोसळल्याने दोन्ही घरातील कुटुंबीय आत अडकून पडले. शेवटी अग्नीशामक दलाने झाड कापून या कुटुंबीयांची सुटका केली.
पहाटे लोक साखरझोपेत असताना अचानक उल्हास बागकर व मंगेश देसाई यांच्या घरासमोरील भले मोठे आंब्याचे झाड कोसळले. मोठा आवाज झाल्याने घाबरून या दोन्ही घरातील कटुंबीय जागे झाले.
झाड कोसळल्यामुळे घराचे पत्रे तसेच इतर साहित्या बरोबरच घरासमोर पार्क करून ठेवलेल्या दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. सुमारे एक लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.