Weekly Horoscope
हा सप्ताह मिथुन, कन्या, मकर, कुंभ राशिगटाला उत्तम, तर मेष, सिंह, धनू राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश-दि. १६-रवी वृश्चिकेत १३/३७. महत्त्वाचे ग्रहयोग-दि. १७-रवी त्रिकोण शनी, दि. १८-बुध लाभ प्लूटो, दि. १९-बुध प्रतियुती नेपच्यून, त्रिकोण नेपच्यून, दि. २०-रवी युती बुध, हर्षल लाभ नेपच्यून, दि. २१-रवी प्रतियुती हर्षल, रवी त्रिकोण नेपच्यून, दि. २२-बुध त्रिकोण शनी, बुध त्रिकोण गुरू. वक्री ग्रह-हर्षल, नेपच्यून, शनी, गुरू, बुध. अस्तंगत ग्रह-दि. १६-बुध अस्त.
रवी, मंगळ, बुध 8 वे. शारीरिक दगदगीच्या मानाने श्रेय कमी मिळेल; पण विपरीत घटनेतून लाभ होईल. विश्वासार्हता टिकवाल. भावनिक दडपण राहील. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी होईल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल कमी राहील.
रवी, मंगळ, बुध 7 वे. भावनिक दडपण राहील. द्रव्यहानी होईल. धंदा-व्यवसायात त्रासदायक घटना घडतील. कायमस्वरूपाची नोकरी मिळेल. कुपथ्य करू नये. स्पर्धकांचा अंदाज घ्या. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. कामात यश मिळेल; पण कष्टाच्या मानाने लाभ कमी होईल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.
रवी, मंगळ, बुध 6 वे. धाडसी वृत्ती बनेल. एखादी संधी कमी श्रमात मिळेल. कला क्षेत्रात यश मिळेल. परदेशगमन घडेल. विवाह जुळेल. कामातील जबाबदारी वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संततीचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढेल. कामात यश मिळेल. मात्र, गोड बोलून कामे करून घ्या.
रवी, मंगळ, बुध 5 वे. मनाची कुचंबणा होईल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. वाहन सौख्य लाभेल. कामासाठी प्रवास घडेल. मोठ्या भावंडांना त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. सप्ताहाच्या शेवटी संतती सौख्य लाभेल.
रवी, मंगळ, बुध 4 थे. घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील. पोटाची तक्रार जाणवेल. पशुधन लाभेल. परदेशगमनाची संधी येईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कलह टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ करून यश मिळवाल. नेहमीच्या कामात शिथिलता येईल.
रवी, मंगळ, बुध 3 रे. धाडसाने, पण सावधगिरीने महत्त्वाची कामे हाती घ्याल व त्यात यश मिळवाल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. विवाह जुळेल. संतती होईल. नवीन संस्था स्थापन कराल. भावनिक दडपण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे कराल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबाच्या गरजा भागवाल.??
रवी, मंगळ, बुध 2 रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. कौटुंबिक खर्च वाढेल. महत्त्वाकांक्षी आनंदी यशवंत बनाल. प्रसूतीसमयी त्रास संभवतो. कार्यक्षेत्र वाढेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवात खर्चिक, चिडचिडीने होईल. कामे रेंगाळली तरी एक-दोन दिवसांत ती पूर्ण करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
रवी, मंगळ, बुध 1 ले. भावनावेग आवरा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चैन कराल; पण आर्थिक प्राप्तीही होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. तीर्थयात्रा, पर्यटन घडेल. विवाह ठरेल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. खर्च वाढेल. प्रतिष्ठा सांभाळा. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी उत्साहाने पूर्ण कराल.
रवी, मंगळ, बुध 12 वे. मोठे खर्च निघतील; पण ते आवश्यक असतील. धंद्यात स्पर्धा वाढेल. कर्माला भाग्याची जोड लाभेल. आर्थिक प्राप्तीही होईल. नातेवाईकांसाठी कामाचा वेळ द्यावा लागेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील. सामाजिक कार्यातून लाभ होतील. कमी श्रमात लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. भावनिक दडपण राहील.
रवी, मंगळ, बुध 11 वे. धाडसाने व बुद्धिकौशल्याने लाभ होतील. विवाह जुळेल. बढती मिळेल. कामाचा इतरांवर चांगला ठसा उमटेल. अनावश्यक खर्च होईल. पुरस्कार मिळवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामात जोडीदाराची मदत मिळेल व कामे होतील. सप्ताहाच्या शेवटी विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल.
रवी, मंगळ, बुध 10 वे. कला, क्रीडा क्षेत्रात आघाडी घ्याल. लेखकांना अनुकूलता भासेल. भाग्यकारक अनुभव येतील. मात्र, भावनावेग आवरा. कामासाठी प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी कामे होतील; पण अपेक्षित अधिकार चालणार नाहीत.
रवी, मंगळ, बुध 9 वे. भाग्यकारक अनुभव येतील. कामासाठी प्रवास घडेल. सामाजिक कार्यात सहभाग राहील. अधिकार गाजवाल. विवाह जुळेल. शैक्षणिक प्रगती लक्षणीय राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सहजीवन लाभेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांची मर्जी सांभाळा.