Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
आज ग्रहांचे गोचर तुमच्या अनुकूल आहे. संततीच्या भविष्यासाठी केलेली एखादी छोटीशी लाभदायक योजना फलद्रूप होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घ्या. एक नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये उत्तम समन्वय राहील. वाहन सावधगिरीने चालवा.
आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन कामांची योजना आखली जाईल आणि ते सुरू करण्यासाठी काही लोकांचे सहकार्य मिळू शकेल. या वेळी आत्मपरीक्षण करून आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशन संबंधित कामांमध्ये अधिक यश मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात अहंकारावरून थोडा वाद होऊ शकतो. कफ आणि तापाचा त्रास जाणवू शकतो.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करा. मुलाच्या करिअरसंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैशांची गुंतवणूक करू नका. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलची सहकार्याची आणि समर्पित भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. कधीकधी काही नकारात्मक विचार मनात येऊ शकतात.
आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या विचार आणि बुद्धिमत्तेने प्रत्येक समस्येवर तोडगा काढू शकाल. एखाद्या संत किंवा गुरूच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला मनःशांती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आज तुमचा उत्साह आणि कार्य करण्याची धडाडी जबरदस्त असेल. कौटुंबिक जीवनात समन्वय राखाल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्य समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.
तुमचे मन शांत राहील. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. राग आणि हट्टीपणा यांसारख्या नकारात्मक गोष्टींमुळे तुमचे काही काम बिघडू शकते, याची जाणीव ठेवा. उत्पन्नाच्या स्त्रोतात थोडा अडथळा येऊ शकतो. पती-पत्नीमध्ये थोडा संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वातावरणामुळे शरीरात वेदना आणि हलका ताप जाणवू शकतो.
तुम्ही तुमच्या कर्म आणि पुरुषार्थाच्या बळावर काही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती देखील मजबूत होऊ शकते. आपल्या ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित राहा. या वेळी अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रतिकूल परिस्थितीत जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.
आज थोडा वेळ आत्म-चिंतन आणि एकांतात घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला रोजच्या समस्यांपासून आराम मिळू शकेल. आजचा दिवस निराशाजनक वाटू शकतो. तुमच्या कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची काळजी घेणे हे तुमचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. व्यापारात परिस्थिती सामान्य राहील. घरात आनंदी आणि शांततापूर्ण वातावरण राहील. गरम-थंड खाण्यामुळे घसा दुखू शकतो.
या टप्प्यावर, तुमच्या आर्थिक योजनेशी संबंधित कामांवर अधिक लक्ष द्या. हे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. घराच्या देखभालीच्या कामांवर योग्य वेळ घालवला जाऊ शकतो. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असू शकते. कौटुंबिक वातावरण सहकार्याचे आणि आनंदी राहील. नकळतपणे तणाव जाणवू शकतो.
सकारात्मक विचार असलेल्या लोकांशी वेळ घालवल्याने तुमच्या सामाजिक कक्षा वाढतील. तुम्ही भावनिकरित्या अधिक सक्षम व्हाल. तुमच्या बुद्धिमत्ता आणि विवेकाने सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. स्वतःवर जास्त कामाचा ताण घेऊ नका.
आज कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे, म्हणून प्रयत्न करत राहा. मागील काही वर्षांपासून तुम्ही आखलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या भावना आणि उदार स्वभावाचा गैरवापर होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. आर्थिकदृष्ट्या थोडी समस्या निर्माण होऊ शकते. कोणाशी संपर्क साधताना काळजी घेणे आवश्यक आहे. जोडीदार आणि कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. आरोग्य ठीक राहील.
आजचा दिवस आर्थिक बाबतीत सर्वोत्तम आहे. कोणाशीही जास्त वादात पडू नका. यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. व्यवसायातील सर्व कामे व्यवस्थित चालतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल. गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.
आज वेळेचे महत्त्व ओळखा. अडथळे असूनही तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या आसपासच्या सकारात्मक लोकांशी थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकरित्या खूप आराम मिळेल. आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. बाहेरील व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. कफ, ताप यांसारख्या समस्या वाढू शकतात.