बाजाराची दिशा Pudhari File Photo
अर्थभान

बाजाराची दिशा

पुन्हा एक घसरणीचा आठवडा

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

पुन्हा एक घसरणीचा आठवडा! परंतु, घसरणीचे प्रमाण खूपच कमी झालेले. निफ्टी आणि सेन्सेक्स हे मुख्य निर्देशांक केवळ अर्धा टक्क्याने घसरले. निफ्टी बँक एक टक्क्याने घसरला. अमेरिकन बाजार सप्ताहात पाच टक्क्यांनी घसरुनही भारतीय बाजार प्रभावित झाले नाहीत. भारतीय बाजाराने आता तळ गाठला आहे, असे मानावयाचे काय?

किरकोळ महागाई जानेवारी महिन्यात 4.31 टक्के होती ती फेब्रुवारीमध्ये 3.61 टक्क्यांवर आली. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा त्यामुळे पल्लवित झाली.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लीने भारतीय बाजाराबद्दल फारच आशादायी रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. कोव्हिडनंतरच्या काळातील सर्वाधिक आकर्षक Valuations भारतीय बाजारात आज दिसत आहेत.भारतीय बाजाराचे Low-beta (कमी उलथापालथ असणारा) असे वर्णन हा रिपोर्ट करतो. इथून पुढे राहिलेल्या वर्षाच्या काळात Cyclical सेक्टर्स Defensive सेक्टर्सपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील आणि स्मॉल कॅप मिड कॅप स्टॉकस लार्ज कॅप स्टॉकस्पेक्षा चांगली कामगिरी करतील, असे हा रिपोर्ट सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर 2025 अखेर मोठीच आपत्ती आली, नाही तर सेन्सेक्स एक लाख पाच हजार होईल, असे हा रिपोर्ट सांगतो.

मुडीजचा भारतीय बाजारांवरचा रिपोर्टही प्रसिद्ध झाला. सरकारचा वाढलेला भांडवली खर्च, आयकरांतील मोठ्या सवतलीमुळे मध्यमवर्गाकडून Consumption वाढण्याचे संकेत आणि रिझर्व्ह बँकेकडून झालेली व्याजदर कपात यामुळे 2025-26 मध्ये भारताचा विकास दर 6.5 टक्के राहील, असे मुडीजचे म्हणजे बँकिंग सेक्टर Out Perform करेल, असे हा रिपोर्ट सांगतो.

इंडसइंड बँकेच्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये काहीतरी गडबड झाली. आणि हा शेअर एका दिवसात 27 टक्क्े आपटला. वैशिष्ट्य म्हणजे हे उघडकीस येण्यापूर्वी फेबु्रवारी महिन्यातच कोटक म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड आणि पराग पारीख म्युच्युअल फंड यांनी बँकेचे 1600 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. या शेअरवर फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये बंदी आली आहे. आता तो सेन्सेक्स आणि निफ्टीमधूनही बाहेर जाईल.

मागील सप्ताहात बाजार जरी मंदीत असला, तरी आठवड्याचे चारही दिवस तेजीत असणारे खालील शेअर्स पाहा.

1) Avenue Super Mart - Rs. 3794.10

2) Adani Energy - Rs. 781

3) GRM Overseas - Rs. 272

4) Tube Investment - Rs. 2920

5) PC Jeweller - Rs. 14

6) Styrenix - Rs. 2740

गेली किमान सहा महिने 600 ते 700 रुपयांच्या रेंजमध्ये फिरणारा अवंती फीडसचा शेअर आता 1000 रुपयांना जाऊन भिडणार असे वाटते. (रु. 842.55)चैन्नई पेट्रो, सारडा एनर्जी, आवास फाइनान्शिअर्स, कृष्णा (KIMS) यांनीही चांगला ब्रेकआऊट दिला आहे. कोटक बँकेचा शेअर्स पूर्वी रु. 1997.70 ला धडकून आला होता. (CMP Rs. 1981.50) आता तो 2000 चा टप्पा ओलांडून 2500 ची वाटचाल सुरू करेल.

Naturewing Holidays या शेअरकडे आपले लक्ष असू द्या. या शेअरचा गुरुवारचा बंद भाव रु. 67.33 आहे. आठवड्यात तो तीस टक्के वाढला. ROE 53.3%, ROCE 72.2 %, आणि PE 19.0 कंपनी कर्जमुक्त आहे. एकदा 100 रुपयांना ओलांडण्याचा असफल प्रयत्न करून पुन्हा एकदा शंभरीकडे वाटचाल हा शेअर करत आहे.

बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंडांवर पण परिणाम करत आहे. फेब्रुवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या विक्रीमध्ये 26 टक्के घट दिसून आली. जानेवारी महिन्यात रु. 39,687 कोटी असणारा इक्विटी म्युच्युअल फंडांचा Inflow फेब्रुवारी महिन्यात रु. 293.3 कोटींवर खाली आला.

आता इकॉनॉमिक्स टाईम्सच्या पोर्टलवर 14 मार्च रोजी प्रसिद्ध झालेली बातमी पाहा. त्यानुसार मागील एका वर्षात निफ्टीने केवळ 1.13 टक्के रिटर्नस् दिले आहेत. परंतु, 78 इक्विटी म्युच्युअल फंडस् असे आहेत, ज्यांनी दहा टक्क्यांहून अधिक रिटर्नस् दिले आहेत. त्यापैकी आघाडीचे म्युच्युअल फंडस् खालीलप्रमाणे : (20 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्नस् देणारे) वरील यादी पाहिली, तर 8 पैकी 5 फंड हे इंटरनॅशनल फंड आहेत. दोन फंड हे फार्मा म्हणजे सेक्टरल फंड आहेत. जोखीम नको म्हणून इंटरनॅशनल आणि सेक्टरल फंडांच्या नावाने बोटे मोडणार्‍या तथाकथित गुंतवणूक सल्लागारांना हे सणसणीत उत्तर आहे.

Hang Seng हा हाँगकाँगचा मुख्य निर्देशांक आहे. जसा आपला Nifty आहे आणि Hang Seng Tech मध्ये टॉपच्या 30 टेक्नॉलॉजी कंपन्यांचा समावेश आहे. आपल्या गुंतवणुकीत वैविध्य (Diversification) असेल आणि सातासमुद्रापार गुंतवणूक संधीचा वेध घेण्याची नजर आपल्याकडे असेल आणि मुख्य म्हणजे थोडी जोखीम घेण्याची आपली मानसिकता असेल, तर असे घवघवीत रिटर्नस् मिळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT