आरोग्य

इन्सुलिन सुयांचा पुनर्वापर टाळा | पुढारी

Pudhari News

डॉ. धीरज कपूर

इन्सुलिन उपचार हा मधुमेह व्यवस्थापनाचा निर्णायक भाग असतो. इन्सुलिन उपचारांवर असलेल्या रुग्णांसाठी इंजेक्शनचे तंत्र आहे. इन्सुलिन योग्य पद्धतीने शोषले जावे म्हणून ते स्नायूपर्यंत न नेता त्वचेखालील जाड स्तरामध्ये इंजेक्ट केले गेले पाहिजे. प्रत्येक इंजेक्शन नवीन जागेतून देणेही महत्त्वाचे आहे. एकाच जागेतून पुन्हा-पुन्हा इंजेक्ट करू नये तसेच प्रत्येक इंजेक्शनच्या वेळी सुई बदलण्याचा सल्लाही आवर्जून दिला जातो.

इन्सुलिन देण्याच्या चुकीच्या तंत्रामुळे वाढलेले नीड्सल्टिक जखमांचे प्रमाण लक्षात घेता, रुग्णालयात इन्सुलिन इंजेक्ट करणार्‍या आरोग्यसेवा व्यावसायिकांनी रुग्णालयातील तसेच आरोग्यसेवा केंद्रातील इन्सुलिन तंत्राबाबत माहिती देण्याची गरज आहे. रुग्णालयात इन्सुलिनचा सुरक्षित वापर व विल्हेवाट यांसाठी इंडोक्रायनोलॉजिस्टस, प्रमुख नर्सेस आणि प्रादुर्भाव नियंत्रण तज्ज्ञ यांचे पथक एकत्रितरीत्या काम करायला हवे. रुग्णांना किंवा त्याची/तिची काळजी घेणार्‍यांना इन्सुलिन तंत्रांचे योग्य प्रशिक्षण मिळेल याची काळजी  वैद्यकीय तसेच नर्सिंग स्टाफने घ्यायला हवी. त्याचप्रमाणे लायपोहायपरट्रॉफी टाळणे कसे गरजेचे आहे याचे प्रशिक्षणही रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी द्यायला हवेे.

इन्सुलिन पेन आणि सीरिंज नीड्ल्स एकदा वापरण्यासाठीच असतात. तरीही मधुमेहाचे बरेच रुग्ण सुरुवातीच्या काळात या सुयांचा पुन्हा-पुन्हा वापर करतात असे निदर्शनास आले आहे. जागरूकतेचा अभाव आणि योग्य इंजेक्शन तंत्र माहीत नसणे यांमुळे रुग्ण एकच सुई पुन्हा-पुन्हा वापरतात. सुई पुन्हा-पुन्हा वापरल्यामुळे तिचे टोक वाकते तसेच बोथट होते, इंजेक्शन वेदनादायी होते, रक्‍तस्राव होणे, डोस कमी-जास्त घेतला जाणे आणि लायपोहायपरट्रॉफीसारख्या समस्या निर्माण होतात. लायपो म्हणजे रुग्णाच्या नेहमीच्या  इंजेक्शन घेण्याच्या जागेवरील त्वचेखाली आलेली जाडसर, रबरी सूज होय. लायपोहायपरट्रोफीमुळे ग्लुकोजच्या पातळीवरील नियंत्रण सुटते. हायपोग्लासेमिया होतो आणि ग्लायकेमिक चढ-उतारांच्या समस्या निर्माण होतात. सुया पुन्हा-पुन्हा वापरण्याची वारंवारता वाढल्यास लायपो होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, असे अभ्यासांमधून दिसून आले आहे.

इंजेक्शन पूर्ण झाले, तरी सुईवर जीवाणूंचे अस्तित्व असते आणि एकच सुई पुन्हा-पुन्हा वापरल्यास जीवाणूंची वाढ होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT