संबरगी : बाडगी येथून चारचाकी वाहनातून 12 पोती रेशनचे धान्य घेऊन जाताना आहार विभागाचे अधिकारी आणि ऐगळी पोलिस उपनिरीक्षक चंद्र नांगनूर यांनी छापा टाकून धान्याची पोती जप्त केल्याची घटना शनिवारी घडली. राजू बसर्गे हे चारचाकी वाहनातून (केए 71 एम 2666) 12 पोती रेशन धान्य घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.
ऐगळी परिसरातून जतला बेकायदेशीर धान्य नेताना ककमरी गावाजवळ वाहनासह तांदूळ जप्त करण्यात आले. या घटनेची नोंद ऐगळी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.