बेळगावात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला.  File Photo
बेळगाव

बेळगावात मिरवणुकीवर दु:खाचे सावट; ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : विसर्जन मिरवणुकीचा गाडा पाठीमागे सरकल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एक जण ठार झाला. तर एक जखमी झाला. बुधवारी (दि. १८) सकाळी साडेदहाच्या सुमारास कपिलेश्वर पुलाजवळील चढावर ही घटना घडली. (Belgaum News)

सदानंद बी चव्हाण-पाटील (वय ४८, रा. पाटील गल्ली, येळूर सुळगा) असे मृताचे नाव आहे. तर विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय ५६, रा. तेगीन गल्ली, वडगाव) असे जखमीचे नाव आहे. (Belgaum News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती विसर्जनासाठी कपिलेश्वर उड्डाण पुलावरून निघाला होता. ट्रॅक्टर चढतीवर असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर काहीसा मागे सरकला. यावेळी पाठीमागे थांबलेल्या दोघांपैकी एक जण चाकाखाली आले, तर दुसरा बाजूला पडला. चाकाखाली आलेले सदानंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. विजय यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT