कारवार येथे घरात घुसून व्यावसायिकाचा खून File Photo
बेळगाव

बेळगाव : पुण्यातील व्यवसायिकाचा कारवारमध्ये निर्घूण खून

पुढारी वृत्तसेवा

कारवार : हणकोण येथे रविवारी (दि.22) पहाटे घरात घुसून पाच जणांच्या टोळीने हल्ला करून पुण्यातील व्यवसायिक विनायक नाईक (वय.52) यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये त्यांच्या पत्नी वैशाली गंभीर जखमी झाल्या आहेत.

विनायक नाईक हा पुणे येथे इलेट्रॉनिक वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत असून हाणकोण येथे आपल्या घरी जत्रेसाठी आला होता. रविवारी ते पुण्याला जाणार होते, पण पहाटे अचानक पाच जण त्यांच्या घरात घुसले व विनायक यांच्यावर हल्ला करून त्याला रक्तबंबाळ केले. तसेच विनायक यांच्या पत्नीवरही हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी असून कारवारच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपी फरार आहेत. हे घटना सदाशिवगड चित्ताकुल पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पत्नीसह पुण्यात राहणारा विनायक नाईक गेल्या आठवड्यात हणकोण येथे ग्रामदैवताच्या जत्रेसाठी आला होता. आज सकाळी पुण्याला जाणार असल्याचे त्याने आपल्या मित्रांना सांगितले होते. मात्र पहाटे त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याने हणकोण गाव हादरले आहे. मात्र त्याचा खून का झाला हा मोठा प्रश्न पोलिसासमोर उभा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT