निपाणी : येथील नगरपालिका कार्यालयासमोर जुना पी.बी रोडला लागून असलेल्या टायर दुकानला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नगरपालिकेसमोर व्यापारी संकुलात उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीचे टायर विक्री व पंक्चर दुकान आहे. शुक्रवारी रात्री जाधव हे नेहमीचे काम आटोपून घरी गेल्यानंतर दुकानातील टायरनी पेट घेतल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली त्यानुसार अग्निशमन दलाचे निरीक्षक वाय. बी. कौजलगी, सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलीस टाण्याचे शिवानंद कार्जोळ यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान आग चांगलीच भडकल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाले आही. यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली.