बेळगाव : काळा दिन पाळण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांना सोडू नका, तुम्हाला कारागृहात घातले तर सोडवायला मी तयार आहे. 1 नोव्हेंबरला काळा दिन पाळण्यात आला तर रणांगण होईल, अशी दर्पोक्ती करवेचा म्होरक्या नारायणगौडाने केली आहे. करवेच्या वतीने आतापासूनच बेळगावचे वातावरण बिघडवण्यासाठी रविवारी (दि. 12) कन्नड दीक्षा नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गौडाने म. ए. समितीवर गरळ ओकून कंडू शमवून घेतला.
तुम्हाला कारागृहात घातले तर मी सोडवायला तयार आहे. काळ्या दिनाला परवानगी दिली तर याठिकाणी रणांगण होईल, अशी दर्पोक्तीही त्याने ठोकली. यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, अथणी मोटगीमठाचे प्रभू चन्नबसव स्वामी, काँग्रेस नेते राहुल जारकिहोळी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी करवेने सामान्य लोकांना वेठीस धरले होते. त्यामुळे, लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.