धन्नूर : अपघातात कारचा झालेला चक्काचूर. Pudhari Photo
बेळगाव

देवदर्शनाहून परतताना चौघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : पुढारी वृत्तसेवा

देवदर्शनाहून परतताना चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना हुनगुंद तालुक्यातील धन्नूर गावाजवळ बुधवारी रात्री घडली. या अपघातात मृत चौघेजण मुद्धेबिहाळ (जि. विजापूर) शहरातील रहिवासी आहेत.रामण्णा नायकमक्कळ (वय 57), लक्ष्मण वड्डर (वय 55), बैलाप्पा बिरादर (वय 46) व महंमद रफीक (वय 23, रा. सर्वजण मुद्धेबिहाळ, जि. विजापूर) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण कारने होस्पेट येथील हुलीगेम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

दर्शन घेऊन परत येताना हुनगुंद तालुक्यातील धन्नूर गावाच्या टोलनाक्याजवळ आल्यावर कारची टेम्पोला धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून टेम्पो रस्त्याशेजारी असलेल्या शेतात जाऊन थांबला. घटनेची माहिती मिळताच हुनगुंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद हुनगुंद पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT