बंगळूर : मंगळूर जिल्ह्यात पुत्तूर येथे सोमवारी (दि. 20) सायंकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यावेळी 11 हून अधिक महिला आणि मुले जखमी झाल्याची घटना घडली.
पुत्तूरचे आमदार अशोक राय यांच्या मालकीच्या राय इस्टेट अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवाळानिमित्त प्लेटस् आणि कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
त्यानंतर प्लेटस् आणि कपडे घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन 11 हून अधिक महिला आणि मुले अत्यवस्थ झाली. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.