बेळगाव : पी. बी. रोडवर रात्री कचरा टाकणा़र्या दोन विद्यार्थ्यांवर शुक्रवारी कारवाई करत 1 हजार रूपये दंड ठोठावला. तसेच टाकलेला कचरा घरी घेऊन जाऊन सकाळी घंटागाडीकडे देण्यास भाग पाडले.
उघड्यावर कचरा टाकू नका. तुमच्या दारात आलेल्या घंटागाडीकडे ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, असे वारंवार आवाहन करुनदेखील काही नागरिकरात्रीच्यावेळी कचरा उघड्यावरच टाकत आहेत.
शुक्रवारी रात्री दोन विद्यार्थी पी. बी. रोडवर कचरा उघड्यावर टाकून जात असताना त्याना गस्त घालणार्या मनपा कर्मचार्यांनी हटकले. तसेच सोबत आणलेला कचरा घरी नेऊन सकाळी घंटागाडीकडे दण्यास सांगितलेे.
तसेच रात्री जप्त केलेली दुचाकी सकाळी त्यांना देण्यात आली. तसेच 1 हजार रूपये दंडदेखील वसूल केला. यापूर्वी कॅण्टोन्मेंट बोर्ड हद्दीत उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.