बेळगाव : प्रकाशाचा उत्सव दीपोत्सवाला सोमवारी (दि. २८) बसुबारसने उत्साहात प्रारंभ झाला, आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरी करण्यात आली. शहर, उपनगरात सार्यकाळपासून भक्तिभावाने गायीचे पूजन करण्यात आले. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीला उधाण आले असून, सर्वत्र चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दिवाळीची पहिली पणती, गाय वासरांसाठी लावून आदर, प्रेम व्यक्त करण्यात आले. मरोघरी मिणमिणता प्रकाश, दारात सप्तरंगी रांगोळी, घरादाराला तोरण, आकर्षक सजावट, घरासमोर आकाशकंदील, विद्युत रोषणाई असे सर्वत्र चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कामधेनू है मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी तसेच भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध जोडला आहे. त्यामुळे हिंदू धर्मा गायीची दिवाळीच्या पहिल्यान दिवशी पूजा करण्याची हजारो वर्षांचं परंपरा दिवाळीच्या पहिल्या दिवशं शहरासह ग्रामीण भागातही जपलं गेली. शहरातील अनेक भागां गायीचे पूजन करण्यात आले. काई ठिकाणी गाय वासराच्या मूर्तीर पूजन करण्यात आले; तर काई ठिकाणी गायीच्या प्रतिमेचेही पूक केले. वसुबारसनिमित्त सोमवारं सकाळपासून सोशल मीडियाव शुभेच्छांचे संदेश दिले जात होते.