मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्‍हणाले, राज्‍य सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे | पुढारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्‍हणाले, राज्‍य सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. मनसैनिकांना दहीहंडी साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. पण, ठाकरे सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी साजरी करण्यावरून सरकारवर निशाणा साधला.

ठाकरे म्हणाले, मनसे कार्यकर्त्यांना दहीहंडी साजरी करण्याचे आदेश मीचं दिले होते. सगळे सण साजरे केले पाहिजेत.शिवसेना विरोधी पक्षात असती तर काय केलं असतं? सरकार सोयानुसार निर्बंध लावत आहे.

हे घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात. तर आम्ही काय करायचं? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.

ते म्हणाले, मंदिर उघडली नाही तर मनसे घंटानाद आंदोलन करेल. नियम लावायचे असेल तर सर्वांना समान नियम लावा. लॉकडाऊन सरकारला आवडतं. म्हणूनचं त्यांना हवी असतील तशी निर्बंध लावत आहेत, असा आराेपही त्‍यांनी केला.

ठाणे मनपाच्या महिला अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.

निर्बंध झुगारून मनसेने पोलिसांसमोर फोडली दहीहंडी

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : राज्‍य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी ला परवानगी नाकारली होती. शासनाच्या या निर्णयाविरोधात भाजप आणि शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवला होता. दरम्‍यान, राज्य सरकारचे निर्बंध झुगारून मनसेने दहीहंडी फोडली.

काळाचौकी येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांचा विरोध झुगारला.

दुसऱ्या थरावर चढत दहीहंडी फोडून शासनाचा निषेध व्यक्त केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने काळाचौकी येथील शहीद भगतसिंह मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

हेही वाचलं का ?

Back to top button