माजी मंत्री अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम न्यायालयात हजर; जामीन मंजूर | पुढारी

माजी मंत्री अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम न्यायालयात हजर; जामीन मंजूर

खेड; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे माजी मंत्री अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम यांना गुरुवारी ( दि. १२ ) रोजी दापोली न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सीआरझेडच्या नियमाचे उल्लंघन करून अवैध बांधकाम करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी माजी मंत्री अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड व एनडिझेड म्हणजे, ना विकास क्षेत्र परिसरात साई रिसॉर्ट उभारल्या बाबत अनिल परब आणि सदानंद कदम यांना दापोली न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी ते न्यायालयासमोर हजर झाले. प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्‍या जातमुचलक्‍यावर  न्‍यायालयाने त्‍यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी आता २३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. .

हेही वाचा : 

Back to top button