केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट! | पुढारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट!

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केला जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी कुडाळ भाजपा युवा मोर्चाने कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे दिले.

नारायण राणे हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्या बाबत फेसबुक व ट्विटरवर दोन व्यक्तींनी मिळून ना.राणे यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून संविधानाचा अपमान केला असून या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुडाळ पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांच्यामार्फत पोलीस निरीक्षकांकडे हे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, सरचिटणीस रुपेश बिडये, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, सोशल मीडिया युवा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर, सोशल मीडिया तालुका संयोजक राम बांदेलकर,प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button