कुडाळ : हिंमत असेल तर रिंगणात उतराच; आमदार वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान | पुढारी

कुडाळ : हिंमत असेल तर रिंगणात उतराच; आमदार वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा; सिंधुदुर्गात नारायण राणेंची ताकद संपलेली आहे, तरीही माजी खासदार निलेश राणे आपल्या प्रत्येक भाषणात याला लोळवू, त्याला लोळवूची अशी भाषा करत आहेत, हे योग्य नाही. एवढीच हिंमत असेल तर, निलेश राणेंनी कुडाळ विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात रिंगणात उरावेच, असे थेट आव्हान ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी निलेश राणेंना दिले आहे.

पुढे बोलताना नाईक म्हणाले, मला खात्री आहे की, जरी ते कुडाळ विधानसभा मततदारसंघातून माझ्या विरोधात जरी रिणांगणात उतरले तरी ते निवडणूक रिंगणातून पळ काढल्याशिवाय राहणार नाहीत. तरीही ते खरेच ‘राणे’ असतील तर त्यांनी रिंगणात उतरून दाखवावेच. मग बघू कोण कुणाला लोळवतय, कुठली जनता कुणाला धूळ चारते, असे खुले आवाहन शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आ. वैभव नाईक यांनी माजी खा. निलेश राणे यांना दिले आहे.

कुडाळ येथे शुक्रवारी (दि.२१) भाजपाची संविधान बचाव रॅली झाली. या रॅलीत माजी खा. निलेश राणे, आ. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड यांनी आ. नाईक यांच्यासह आ. भास्कर जाधव यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर आ. नाईक यांनी कुडाळ शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक संतोष शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, रूपेश पावसकर आदी उपस्थित होते.

लोकशाहीच्या मार्गाने लोकप्रतिनिधी निवडला जातो. आतापर्यंत दोनवेळा मी लोकशाही पद्धतीने निवडून आलो. माझी कंपनी, नाटक आणि नाटकातील माझा राजाचा रोल कुडाळ विधानसभा निवडणुकीत ठरलेला आहे. त्यामुळे निलेश राणेंनी हिंमत असेल, ते जर राणेंचे नाव सांगत असतील तर त्यांनी माझ्या विरोधात कुडाळ विधानसभा मतदार संघात रिंगणात उतरावेच. मग कोण कुणाला धुळ चारेल हे दिसेल असे खुले आव्हान माजी खा. निलेश राणे यांना दिले आहे.

Back to top button