‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी १६ एप्रिलला सुनावणी : किरीट सोमय्या | पुढारी

'साई रिसॉर्ट' प्रकरणी १६ एप्रिलला सुनावणी : किरीट सोमय्या

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुरूडमधील (दापोली) साई रिसॉर्ट वर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दापोली न्यायालयात यासंबंधी सुनावणी सुरू आहे. येत्या १६ एप्रिल रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होईल, अशी माहिती भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज ( दि. 31 )  दिली. सोमय्या सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून, अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामासंबंधी ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

परब यांनी बांधकाम करीत पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ मधील सीआरझेड नियमांचे उल्लंघन केले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्यांच्या अनाधिकृत बांधकामाची दखल घेतली असून, मंत्रालयातील अधिकारी सुरेश कुमार यांच्या वतीने यासंबंधी रितसर तक्रार देण्यात आली आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणी परबांकडून करण्यात आलेले बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अशात न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे मात्र राज्यातील राजकारण तापले आहे. परब यांच्या दापोलीतील मुरुडमध्ये रिसॉर्टबाबत सोमय्यांनी आरोप केले होते. तसेच, नुकताच त्यांनी दापोलीचा दौरा केला होता. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button