संग्रहित छायाचित्र.
कोकण
रत्नागिरी : खेडमध्ये भंगार डेपोमध्ये स्फोट : एक गंभीर जखमी
खेड (रत्नागिरी ), पुढारी वृत्तसेवा : शहरातील डाकबंगला परिसरात भरवस्तीत असलेल्या भंगार डेपोमध्ये सोमवार (दि. २९) दुपारी दाेनच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बुरहान टांके यांनी रुग्णवाहिकेतून जखमीला रुग्णालयात दाखल केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील डाकबंगला भागात मोठा आवाज झाला. चारही बाजूने व्यापारी व निवासी संकुले असल्याने अनेकजण आवाज ऐकून कशाचा हे पाहण्यासाठी रस्त्यावर आले. त्यावेळी नजीकच्या भंगार डेपो मध्ये स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.
हेही वाचा :