नारायण राणे म्हणाले 'अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही' | पुढारी

नारायण राणे म्हणाले 'अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही'

चिपळूण; पुढारी ऑनलाईन : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, मी केंद्रीय मंत्री आहे. मी जे बोललो ते गुन्हा नाहीच. आदेश कुठलाही काढू देत तो काही राष्ट्रपती आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहित नाही. तक्रारदार सुधाकर बुडगजरला मी ओळखत नाही. उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात त्यावेळी गुन्हा होत नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे राणेंनी ठामपणे सांगितले.

राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली तेव्हाच शिवसेना गेली, अशी टीका त्यांनी केली आहे.

दिल्लीत देखील आमचे सरकार हे लक्षात ठेवा. बोलणाऱ्यांनी समोर यावं, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

अटक करताना प्रोटोकॉल पाळण्याची सूचना पोलीस पथकाला करण्यात आली आहे. आता राणे यांना अटक होते की काय याकडे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बडगुजर यांनी नाशिक पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.

दरम्‍यान, चिपळूणमध्‍ये पोलिस बंदोबस्‍त वाढविण्‍यात आला आहे. वालोपे येथील रिमझ हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही. प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाइल आहे. त्यात द्वेष नाही. पण केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र

Back to top button