धक्कादायक! दापोलीत ३ वृद्ध महिलांचा जळून मृत्यू; कारण अस्पष्ट | पुढारी

धक्कादायक! दापोलीत ३ वृद्ध महिलांचा जळून मृत्यू; कारण अस्पष्ट

दापोली, पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील वनौशी खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांचा एकाच घरात जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली आहे.

खोतवाडी येथील सत्यवती पाटणे (वय-७५), पार्वती पाटणे (वय-९०) आणि इंदुबाई पाटणे (वय-८५) या तीन महिलांचा जळून मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस तपास करण्याचे काम शुक्रवारी  सुरू होते.

या तीनही महिला गावांमध्ये एकमेकांच्या आधाराने राहत होत्या. त्यांच्या मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट न झाल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button