International Film Festival : सिताऱ्यांच्या झगमगाटात इफ्फीचा समारोप; प्रसून जोशींना पुरस्कार | पुढारी

International Film Festival : सिताऱ्यांच्या झगमगाटात इफ्फीचा समारोप; प्रसून जोशींना पुरस्कार

पणजी; पुढारी वृत्तसेवा:  इफ्फीमध्ये यावर्षी ‘उत्कृष्ट भारतीय व्यक्तिमत्व’ या पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसून जोशी (Prasoon Joshi) सांगता समारंभासही उपस्थित राहिले आहेत. यावेळी ‘रेड कारपेट’ वर माध्यमांशी बोलताना त्यांनी इफ्फीचे International Film Festival चे लक्ष नेहमी तरुणांवर असले पाहिजे अशी भावना व्यक्त केल्या.

देशात अनेक पुरस्कार वितरण कार्यक्रम होत असतात. ते एका रात्रीचे असतात. पण हे असे महोत्सव हे सिनेमांना वेगळी ओळख देतात. आपण जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने, दृष्टीने सिनेमे बघू तेव्हा येणारे सिनेमे हे अधिक उत्कृष्ट होऊ शकतील. आणि कला ही एक प्रवाहित धारा आहे. ती कुठे पोहोचत नाही. ती वाहत राहते असे सांगितले.

यावर्षी ७५ सर्जनशील तरूण या उपक्रमाद्वारे देशातील तळागाळातील तरुणांना जे व्यासपीठ देण्यात आले आहे. त्याचा मला खूप आनंद झाला आहे. हे व्यासपीठ जर देश सातत्याने देवू लागले तर तरुण या क्षेत्रात येण्यास धडपडू लागतील. हा मात्र या व्यासपीठाचा वापर करून घेणे हे सर्वथा तरुणांवर आहे असे ते म्हणाले. (Prasoon Joshi)

दरम्यान मला मिळालेला पुरस्कार हा मी माझे बालपण जिथे गेले त्या उत्तराखंडला समर्पित करतो असे ते म्हणाले. त्या प्रदेशातील डोंगर रांगांमुळे माझ्यामध्ये एक संवेदनशीलता आणि सृजनशीलता निर्माण झाली असे ते म्हणाले.

हे ही वाचा :

Back to top button