माजी राज्यमंत्री हुसेन दलवाई यांचे निधन | पुढारी

माजी राज्यमंत्री हुसेन दलवाई यांचे निधन

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी मंत्री आणि खेडचे माजी आमदार, ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई (सिनिअर) यांचे मुंबई येथे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते.

ते चिपळूण शहरालगतच्या मिरजोळी गावचे मूळचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. याच काळात राज्यात त्यांनी न्यायमंत्री म्हणून काम पाहिले. ते दोनवेळा राज्यसभेवर निवडून गेले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून लोटे येथील औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोकणात अनेक विकासकामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

Back to top button