Mon, Sep 24, 2018 03:20होमपेज › राशिभविष्य
Generic placeholder thumbnail

मेष

वादविवाद टाळा.

Generic placeholder thumbnail

वृषभ

आरोग्य उत्तम राहील.

Generic placeholder thumbnail

मिथुन

अकल्पित घटना घडतील.Generic placeholder thumbnail

कर्क

प्रलंबित कामे मार्गी लावाल.

Generic placeholder thumbnail

सिंह

अचूक निर्णय अर्थलाभ करून देईल.

Generic placeholder thumbnail

कन्या

कुटुंबाला प्रभावित कराल.Generic placeholder thumbnail

तूळ

महत्त्वाकांक्षा वाढतील.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

यथायोग्य विचार करून कामे करा.

Generic placeholder thumbnail

धनु

मिश्रित परिणाम मिळतील. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.Generic placeholder thumbnail

मकर

आरोग्याची काळजी बाळगा. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा.

Generic placeholder thumbnail

कुंभ

थोडी हुशारी आपल्यासाठी लाभदायक राहील.

Generic placeholder thumbnail

मीन

चांगल्या वेळेचे योग संभवतात. नियोजित कामे पूर्ण होतील.Generic placeholder thumbnail

मेष

बुद्धिकौशल्याने यश रवी (दि. 17 पासून) बुध (18 नंतर) 6 वे. सतत उद्योगी राहाल. कामे बुद्धिकौशल्याने यशस्वी होत जातील. मान-सन्मान लाभेल. कायमस्वरूपी लक्षात राहतील, अशी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. मान-सन्मान लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभाच्या घटना घडतील.

Generic placeholder thumbnail

वृषभ

उच्च शिक्षणामुळे अधिकार र. बु. 5 वे. उच्च शिक्षणामुळे चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. मतलबीपणामुळे एखाद्या लफड्यात अडकू शकाल. धार्मिक कामासाठी खर्च कराल. कामात विलंब होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

Generic placeholder thumbnail

मिथुन

मानसिक उद्विग्‍नता र. बु. मानसिक उद्विग्‍नता राहील. कला, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत भरघोस यश मिळेल. कुटुंबात अशांतता अनुभवाल. शारीरिक दगदग, व्याधी, भाजणे, खरचटणे इ. अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला हाताखालील व्यक्‍तींचे सहकार्य मिळावावे लागेल. वाद टाळा. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी मिळेल.Generic placeholder thumbnail

कर्क

विकास योजना राबवाल र. बु. 3 रे. विकासासाठी सावधपणे नवीन उपाययोजना राबवाल. वाहनसौख्य लाभेल. कुटुंबात चहाच्या पेल्यातील वादळाचा अनुभव घ्याल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. अतिआत्मविश्‍वास राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसाठी वेळ द्याल. कामाचा व्याप वाढेल. वाद टाळा. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

Generic placeholder thumbnail

सिंह

आर्थिक प्राप्ती जेमतेम र. बु. 2 रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम पण चांगली खर्चापुरती राहील. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जवळचे सर्व कौशल्य वापराल. हौसमौज कराल. इतरांना विशेष महत्त्व देणार नाही. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात शिथिलता येईल. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. संततीच्या अडचणी समजून घ्या. आव्हानात्मक कामे स्वीकाराल. वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी सहकार्याचे वातावरण लाभेल.

Generic placeholder thumbnail

कन्या

महत्त्वाकांक्षी व स्वाभिमानी र. बु. 1 ले. महत्त्वाकांक्षी व स्वाभिमानी बनाल. धंदाव्यवसायात चैतन्य आणाल. मोठे आर्थिक लाभ होतील. कुटुंबात तुमचे लाड होतील. शेती बागायतीची कामे होतील. जवळच्या व्यक्‍तींना दुखवू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. एक-दोन दिवस थकवा जाणवेल. मित्रांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर राहील. सप्ताहाच्या शेवटी आव्हानात्मक कामे करावी लागतील.Generic placeholder thumbnail

तूळ

मोठे खर्च र. बु. 12 वे. आर्थिक प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. परदेशगमनाची संधी लाभेल. पार्लरवर खर्च होईल. पोटाची तक्रार जाणवेल. आशावादी, महत्त्वाकांक्षी, प्रयत्नवादी राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. पोटाची तक्रार, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी संततीबद्दल संवेदनशील राहाल.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

स्वकर्तृत्वाने लाभ र. बु. 11 वे. स्वकर्तृत्वाने आर्थिक लाभ होतील. परदेशगमनाची संधी लाभेल. चैनीप्रीत्यर्थ खूप खर्च होईल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. कौटुंबिक समस्या, भाऊबंदकी जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक समस्या व गरजापायी खर्च होईल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल.

Generic placeholder thumbnail

धनु

वरिष्ठ कामावर खूष होतील र. बु. 10 वे. वरिष्ठ कामावर खूष होतील. कर्माला भाग्याची जोड लाभेल. खरेदी-विक्री वाढेल. मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक समस्या तीव्रतेने जाणवतील. शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण करू शकाल. कौटुंबिक कारणासाठी मोठा खर्च होईल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास यासाठी खूप धावपळ होईल.Generic placeholder thumbnail

मकर

भाग्यकारक अनुभव र. बु. 9 वे. भाग्यकारक अनुभव येईल. पतप्रतिष्ठेत सुधारणा होईल. आर्थिक कोंडी सुटेल. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. धंदाव्यवसायातले अंदाज चुकतील. फार दुर्लक्ष झाल्यास नुकसान होईल. सर्व ठिकाणी वाद टाळा. क्रोध आवरा. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक-दोन दिवस खर्चाचे जातील. काम बिघडेल. चिडचिड होईल. रेंगाळलेली कामे दोन दिवसांत पूर्ण कराल. शेवटी कुटुंबाच्या गरजा भागवाल.

Generic placeholder thumbnail

कुंभ

Generic placeholder thumbnail

मीनपंचांग


रविवार, दि. 23 सप्टेंबर 2018. भाद्रपद शु. 14, अनंत चतुर्दशी, शके 1940. विलंबीनाम संवत्सर, नक्षत्र - शततारका, सूर्योदय - स. 6.29, सूर्यास्त - सायं. 06.33. हिजरी सन 1440, विषुव दिन, सामान्य दिवस.