Fri, Jan 24, 2020 04:51
    ब्रेकिंग    होमपेज › National › मोदींनी चक्क विचारले, 'ये PUBG वाला है क्‍या'

मोदींनी चक्क विचारले, 'ये PUBG वाला है क्‍या'

Published On: | Last Updated:
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे' चर्चा या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून संवाद साधला. या चर्चेत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेस कसे सामोरे जायचे याबद्दल कानमंत्र देण्‍यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्‍यासोबत पालकांना देखील नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्‍थित असलेल्‍या पालकांच्‍याकडून मोदी यांनी काही प्रश्‍न विचारण्‍यात आले. यावेळी एका मुलाच्‍या आईकडून प्रश्‍न विचारण्‍यात आला की, माझा मुलगा नववीत शिकत आहे, ऑनलाईन गेमच्‍या वेडापायी तो अभ्‍यासापासून परावृत्त होत आहे. या प्रश्‍नावर नरेंद्र मोदी यांनी  'ये पीयुबीजी वाला है क्‍या ?'( (Playerunknown's Battlegrounds))  असा प्रतिप्रश्‍न केला. या प्रश्‍नानंतर हशा पिकला. 

या प्रश्‍नावर मोदी यांनी चिंता देखील व्‍यक्‍त केली. ते म्‍हणाले की, मुलांना अशापद्धतीने तंत्रज्ञानापासून लांब ठेवल्‍यास त्‍यांचा तोटा करण्‍यासारखेच आहे. ही समस्‍यापण आहे आणि समाधानही आहे.

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांना देखील मार्गदर्शन केले. यावेळी ते म्‍हणाले की, परीक्षेच्‍या पलीकडे खूप मोठे जग आहे. स्‍वप्‍न, अपेक्षा असाव्‍यात मात्र त्‍याचा तणाव नसावा. पालकांनी मुलांना प्रोत्‍साहन दिले पाहिजे. त्‍यांच्‍या चुका सुधारण्‍यासाठी पालकांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. मुलांना अभ्‍यास, परीक्षा यासंबंधी ताण निर्माण केल्‍यास परिस्‍थिती बिघडेल. 

'परीक्षा पे' चर्चा  याच्‍या माध्‍यमातून १६ देशातील विद्यार्थ्यांसह देशातील २४ राज्‍यांतील विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. सातवीपासूनच्‍या विद्यार्थ्यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.   

तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा, हे मुलांना पालकांनी सांगायला हवे. पालकांनी मुलांच्‍यासोबत तंत्रज्ञानावर चर्चा करावी, अशापद्धतीने  मोदी यांनी तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांच्यात वाढता वापर याबद्दल पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

दरम्यान, पीयुबीजी (PUBG) या गेमवर गुजारत येथे बंदी घालण्‍यात आली आहे. या गेमची निर्मिती २०१७ मध्‍ये करण्‍यात आली. या गेमचे भारतासह जगभरात मोठ्‍याप्रमाणात चाहते आहेत.