Fri, Jan 24, 2020 05:01
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पबजी गेम’साठी नवा मोबाईल  दिला नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

‘पबजी गेम’साठी नवा मोबाईल  दिला नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

Published On: | Last Updated:
कुर्ला : वार्ताहर

पबजी गेमसाठी अपडेटेड मोबाईलचा हट्ट पूर्ण न झाल्याने नदीम नसीर शेख(18) या तरुणाने कुर्ल्याच्या जागृती नगर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. 

नदीम मोठा भाऊ नईमकडे गेले काही दिवस 37 हजार रूपये किमतीच्या महागड्या अपडेटेड मोबाईलची मागणी करीत होता. भावाने 20 हजार रुपये मोबाईल घेण्यास दिले. परंतु नदीमला तोच मोबाईल पाहिजे असल्याने त्याने भावाला पैसे परत करत त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर तो त्याच्याकडे असलेल्याच मोबाईलवर पबजी खेळत राहिला. मात्र रात्री सगळे झोपल्यानंतर नदीमने गळफास लावून आत्महत्या केली.

नदीम गेले काही दिवस पबजी गेम खेळण्यात मग्न असे. या गेमच्या अपडेट स्टेप्ससाठी त्याला नवा अपडेटेड मोबाईल हवा होता. महागडे मोबाईल, नवनवे गेम्स यांचे जणू तरुणाईला व्यसन जडले आहे.  हा प्रकार आता तरुणाईच्या जीवावर बेतताना दिसत आहे. अशा घटनांमुळे पालकांची चिंता वाढत आहे.