Fri, Jan 24, 2020 05:29
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ब्ल्यू व्हेल, पोकेमॉननंतर आता ‘पबजी’!

ब्ल्यू व्हेल, पोकेमॉननंतर आता ‘पबजी’!

Published On: | Last Updated:
कोल्हापूर : पूनम देशमुख 

स्मार्टफोन हाती येताच त्यावरील गेम प्रत्येकाला आकर्षित करतात. व्हिडीओ किंवा ऑनलाईन गेमच्या ‘अ‍ॅडिक्शन’मुळे आधीच मैदानी खेळ विस्मरणात जात असताना मोबाईल गेम अक्षरशः मुलांचा ‘खेळ’ करतो आहे. ब्ल्यू व्हेल, पोकेमॉन यासारख्या गेमचे पेव सुटले होते, यामुळे काहीजण आपल्या जीवालाही मुकले आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपूरमधील एका युवतीला जीव गमवावा लागला आहे.  

कव्हर दे...  फायर दे.... अटॅक कर... आजकाल कॉलेज कॅम्पसपासून ते गल्लीच्या कोपर्‍यापर्यंत असे आवाज अलीकडे दिवस-रात्र ऐकू येतात. त्याला घाबरून जाऊ नका, कारण सध्या तरुणाई पबजी खेळतेेेेे आहे. या गेमची क्रेझ इतकी वाढली आहे. या गेमचे पूर्ण नाव प्लेअर अननोन्स बॅटल ग्राऊंड असे आहे. यामध्ये अनोळख्या व्यक्ती एकमेेकांचा खात्मा करण्यासाठी युद्धभूमीवर उतरतात. बॅटल रॉयल या जापनीज सिनेमाच्या धर्तीवर या गेमची रचना केली आहे. 

उत्कंठा वाढवणारा असा हा गेम शेवटच्या टप्प्यापर्यंत खिळवून ठेवतो. हा गेम तीन प्रकारे खेळता येतो. सोलो अर्थात एकटेेे, दोघेजण अथवा तुम्ही आणि तुमच्यासोबत इतर 99 जणांच्या टीमने खेळता येतो. एका बेटावर उतरवल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी इतर शत्रूपासून संरक्षण करत अखेरपर्यंत टिकून राहण्याचा थरारक प्रवास या गेममधून अनुभवता येतो. ब्राँझ लेवलपासून सुरुवात होऊन ती क्राऊन लेवलपर्यंतच खेळण्याची मजा तरुणाई घेत आहे. हा एकमेव असा गेम आहे, आपण आपल्या ऑनलाईन फ्रेंडला विनंती करून या खेळात सहभागी करून घेऊ शकतो. 

सुरुवातीला गंमतीशीर वाटणारा हा खेळ नंतर इतका सवयीचा होतो की, त्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही.

मोबाईलचा अति वापर हा  मानसिक आजार आहे. आयसीडी - 10 (इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज) मध्ये मोबाईलचा अतिवापर हा आजारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे  नैराश्य आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. 
- डॉ. व्यंकटेश पोवार (मानसोपचार तज्ज्ञ, सीपीआर)