Sun, Jun 07, 2020 02:35होमपेज › Youthworld › नकोय ती व्हॉट्सॲप ग्रुपची कटकट? : आता आपल्यासाठी 'हा' खास पर्याय!

नकोय ती व्हॉट्सॲप ग्रुपची कटकट? : आता आपल्यासाठी 'हा' खास पर्याय!

Published On: Apr 03 2019 4:46PM | Last Updated: Apr 03 2019 4:12PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

व्हॉट्सॲप सतत काही ना काही नवे फीचर आणत असत. युजर्सच्या आवडीनिवडी पाहता व्हॉट्सॲप नवे बदल करत असते. आता आणखी एक व्हॉटसअपने नवे फीचर आणले आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता ॲडमिनचे राज्य चालणार नाही. त्यामुळे आता तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये ॲड करता येणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने फेक न्यूज रोखण्यासाठी टिपलाइन नंबर नंतर आता ग्रुप मेंबरशी संबंधित एक प्रायव्हसी सेटींग फीचर भारतात लाँच केलं आहे. एखादा ग्रुप अ‍ॅडमिन युजरला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार की नाही हे ठरवण्यासाठी युजर्सना एक पर्याय देण्यात येणार आहे. देण्यात येणारा हा पर्यायाचा कालावधी केवळ ३ दिवस असणार आहे. आज अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी हे फीचर लाँच करण्यात आले. 

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर देखील लवकरच लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर प्रायव्हेसी सेक्शन मध्ये असणार आहे.