Tue, Jan 22, 2019 08:27होमपेज › Youthworld › जगाला हसवणारा अवलिया ‘चार्ली चॅप्‍लिन’

चार्ली म्हणायचा, ‘माझ दुःख लोकांना हसवेल’ 

Published On: Apr 16 2018 3:48PM | Last Updated: Apr 16 2018 3:48PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

‘चार्ली चॅप्‍लिन’ हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर ‘काळ्या-पांढर्‍या’ वेशातला दोन व्यक्ती समोर उभे राहतात. इंचभर मिशी, हातात काठी आणि डोक्यावर काळी टोपी, अस रूप असणारा असामान्य कलाकार म्हणजे हा चार्ली चॅप्‍लिन. आपल्या साध्या कृत्यांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा हा अवलिया आबालवृद्धांपर्यंत आजही सगळ्यांना खिळवून ठेवतो. पण या हसवणाऱ्या चेहऱ्या मागील दुःख कुणालाच ठावूक नाही.

चार्ली चॅप्‍लिनचा जन्म

चार्ली चॅप्‍लिनचा जन्म लंडनमध्ये 16 एप्रिल 1889 रोजी झाला. चार्ली चॉप्लिनच पर्ण नाव चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन असे आहे. वयाच्या ९व्या वर्षी त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला काम करावे लागले. लहान वयातच घरच्यांपासून दुरावलेला चार्लीच्या शिक्षणाची दोर वयाच्या १३ व्या वर्षींच तुटली.  

चार्लीच्या अभिनयाला सुरूवात

चार्लीची अभिनयाची सुरूवात वयाच्या १९ व्या वर्षी अमेरिकामध्ये झाली. अमेरिकामध्ये चित्रपटात काम करता करता १९१८ साली तो जगभरात प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांचा चाहता झाला. 

पहिला चित्रपट
चार्लीचा पहिला चित्रपट 'मेकिंग अ लिविंग' हा १९१४ साली प्रदर्शित झाला होता. १९२१ साली चार्लीचा पहिल्यांदा फुल लेंग्थ फीचर फिल्म 'द किड' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चार्ली चॅप्लिन यांनी जगातील दोन्ही महायुद्ध स्वतःच्या नजरेने पाहिली होती. या महायुद्धामुळे जगातील सर्व लोक चिंतेत आणि भयानक परिस्थितीतून जात असताना त्याना हसवण्याचे काम चार्लीने केले. चार्ली चॅप्लिनने एके दिवशी असे सांगीतले होते की , ''माझ दुःख हे लोकांचे हसवण्याचे कारण बनेल , पण माझ हसवण हे कधी लोकांसाठी दुःखाचे कारण ठरू नये". 

चार्ली कोणताही संवाद न करताच तो लोकांना हसवत होता. 'अ वुमन ऑफ पैरिस', 'द गोल्ड रश', 'द सर्कस', 'सिटी लाइट्स', 'मॉर्डन टाइम्स' अशा अनेक चित्रपटातून त्याने लोकांना हसवले आहे. 

कोवळ्या वयातच फार दु:ख भोगावं लागलेल्या चार्लीला लहानसहान गोष्टीतून आनंद वेचायची कला अवगत झाली होती आणि म्हणूनच सामान्य माणूस ज्या गोष्टीतून आनंद घेऊ शकणार नाही, त्याच रोजच्या प्रसंगांमधून तो आपल्याला हसवू शकत होता.

Tags :  charlie Chaplin, actor,  facts , funny