होमपेज › Youthworld › कॉलेज निवडण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी....

कॉलेज निवडण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी....

Published On: Jun 11 2018 6:56PM | Last Updated: Jun 11 2018 6:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

शालेय जीवन संपताच आपण महाविद्यालयात प्रवेश घेण्याची नवनवीन स्वप्ने पाहत असतो. अनेक स्वप्ने आपण उराशी बाळगून विविध शैक्षणिक क्षेत्रांना भेट देत असतो. मग, त्‍यानुसार, आपण अनेकांचे मार्गदर्शन आणि सल्‍लेही घेतो. या आधुनिक जीवनात आपल्याला आवडत्या क्षेत्रांकडे जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्‍या क्षेत्रात अनेक संधीही असतात. त्‍यामुळे काही वेळा आपण संभ्रमात पडतो की, आपल्‍याला नेमके काय करायचे आहे?, कोणत्‍या महाविद्‍यालयात, शैक्षणिक संस्‍थेत प्रवेश घ्यावा, यासाठी काही टीप्स.....

शिक्षण

Image result for college professor

कोणतेही महाविद्यालय निवडताना त्याचा दर्जा कसा आहे हे पाहणे योग्य ठरेल. त्यासाठी मागील विद्यार्थ्यांची चर्चा करा. त्यांचे काही अनुभव तुम्हाला  महाविद्यालय निवडण्यासाठी मदत करतील. तसेच महाविद्यालयामधील शिक्षकवर्ग कसा आहे, याचीदेखील खात्री करून घ्या. तुम्हाला कोणत्या क्षेत्राकडे जायचे आहे, त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान त्या महाविद्यालयात दिले जाते का पाहा. या अशा सर्व पर्यायातून कॉलेज कसे निवडावे ते पाहा.

महाविद्यालयाची जागा

महाविद्यालय निवडताना ते घरापासून किती दूर आहे ? तसेच कोठे आहे? महाविद्यालयाला जाण्यासाठी वाहतुकीची सोय  काय व कशी  आहे ते पाहा.  शक्यतो तुम्हाला परीक्षेच्या कालवधीत कोणताही त्रास होणार नाही असे महाविद्याल निवडा. तुम्हाला कोणतीही शारिरीक त्रास उद्भवणार नाही याचीदेखील काळजी घ्या. 

महाविद्यालयाची संस्कृती

Related image
प्रत्येक महाविद्यालय स्वतःची हटके ओळख ठेवण्यासाठी विविध संस्कृतीचा अवलंब करत असते. त्यांनी एक स्वतःची संस्कृती जपलेली असते. काही महाविद्यालयें अभ्यासाव्यतिरीक्त अनेक डे साजरे करण्यात बिझी असते. या सर्वाचा परिणाम आपल्या भविष्यावर होत असतो. त्यामुळे कोणत्या संस्कृतीचे कॉलेज निवडणे हे आपल्या हातात असते.

व्यक्तिमत्व विकास

Image result for choosing college

शालेय जीवन संपताच आपली खेळखोर वृत्तीचला पूर्णविराम मिळण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे आपला खरा विकास महाविद्यालयात होत असतो. शालेय जीवनातील बंधनामधुन मुक्त होऊन मुक्त जीवनाचा आनंद लुटण्याच्या दिवसांना सुरूवात होते. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय किती पुरक आहे ते जाणून घ्या. अभ्यासाव्यतिरीक्त कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते ते पाहा. 

महाविद्यालयाची फी

Image result for college fees

सध्याच्या जगात शिक्षण म्हणजे एक बाजार असल्यासारखे वाटते. काही अशा संस्था आहेत ज्या शिक्षणाच्या नावाखाली पैसे उफळण्यात तरबेज असतात. त्यामुळे कोणत्याही शिक्षणासाठी कोणत्याही संस्थेची निवड करण्याआधी ती अभ्यासात्मक आहे का की नुसताच तिथे पैसा बोलतो ते पाहा. 

yesSo admission लेते वक्त all the best