Thu, Nov 14, 2019 07:48होमपेज › Youthworld ›  'शु बाईट्‍स'ला आता करा टाटा..बाय..बाय

 'शु बाईट्‍स'ला आता करा टाटा..बाय..बाय

Published On: Jul 01 2019 1:28PM | Last Updated: Jul 01 2019 1:20PM
पुढारी ऑनलाईन 

पावसाळ्‍याची सुरुवात झाली आहे, नवीन वस्‍तू खरेदीचा जोर वाढला आहे. छत्री, चप्‍पल याची खरेदी देखील केली असेल. अशावेळी नवीन छत्री, नवीन घेतलेल चप्‍पल कधी घालतोय, असे होते. पण होते काय आपण हौसेने घेतलेली नवीन चप्‍पल पहिल्‍यांदा घातली की, चप्‍पल पायाला लागते, त्‍यालाच  आपण चप्पल चावणे, म्‍हणजेच 'शू बाईट्‍स' असे म्हणतो. चप्पल पायाल लागल्‍यावर खूप त्रास होतो. बर्‍याच जणांना पायाला फोड उडतात, जखमण होते. पावसाळ्‍याच्‍या दिवसात या जखमा लवकर बर्‍या होत नाहीत. यावर उपाय म्हणून आपण लगेचच एखादी क्रिम किंवा बँडेड लावतो. उपचार तर घ्‍याच पण अशावेळी स्वयंपाकघरातील जंतूनाशक आणि दाहशामक क्षमता असणाऱ्या गोष्टी देखील वापरू शकतो. या प्रभावी तर असतातच शिवाय यांचे दुष्परिणामही होत नाहीत. चप्‍पल लागल्‍यावर आपण स्वयंपाकघरातील कोणत्या गोष्टींचा वापर करू शकतो याविषयी थोडक्‍यात माहिती...

खोबरेल तेल 

चप्पल  लागल्‍यावर खोबरेल तेल लावतात हे बऱ्याच जणांना ठाऊक असते. सर्वांच्‍या घरात खोबरेल तेल असेतेच, जखमेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा मॉयश्चराइज होऊन जखम बरी होण्यास मदत होते व जंतूसंसर्ग होण्यापासूनही बचाव होतो. तसेच नवीन चप्पल वापरण्याअगोदर तिला खोबरेल तेल लावल्यास ती मऊ होते व त्रास होत नाही. 

तांदळाचे पीठ 

घरी तांदळाचे पीठ असतेच, चप्पल लागल्यास तांदळाच्या पिठानेही झटकन उपाय करता येतो. यामुळे शुष्क त्वचा निघून जाते, तसेच दाह आणि खाजही कमी होण्यास मदत होते. तांदळाच्या पिठामध्ये पाणी मिसळून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावावी व सुकल्यावर पाण्याने धुवावी. जखम बरी होईपर्यंत हा उपाय करावा.

कोरफड 

कोरफडीचे बरेच उपयोग आहेत. कोरफडीमुळे जळजळणे, खाज सुटणे आणि वेदनांपासून आराम मिळतो. कोरफडाच्या गरातील दाहशामक क्षमतेमुळे जखम लवकर बरी होऊन जंतूसंसर्ग होण्यापासून बचाव होतो. कोरफडाचा गर काढून जखमेवर लावावा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. असे तीन, चार दिवस सकाळ, संध्याकाळ नियमीत करावे.

टूथपेस्ट 

चप्पल लागल्यामुळे येणारा फोड आणि खाज यांपासून टूथपेस्टने कसा आराम मिळेल, याचे आश्चर्य वाटले ना? टूथपेस्टमध्ये जखम बरी होण्यासाठी आवश्यक बेकींग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि मेन्थॉल असते. रात्री झोपताना जखमेवर थोडीशी टूथपेस्ट लावावी व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर त्यावर पेट्रोलियम जेली लावावी. यासाठी जेल-बेस्ड टूथपेस्ट लावू नये.

हळद आणि कडुलिंबाची पाने 

हळद – ‘जंतूनाशक’ आणि कडुलिंबाची पाने  ‘दाहशामक’ हे दोन्ही गुण एकत्र आले की, चप्पल चावल्यामुळे जखम होणे, खाज सुटणे किंवा सुजणे यांपासून आराम मिळतो. कडूलिंबाची पाने बारीक वाटून त्यात हळद मिसळून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावून 20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावी. जखम लवकर बरी होण्यासाठी ही पेस्ट दिवसातून दोनदा लावावी.  

मध आणि तीळाचे तेल 

चप्‍पल चावल्‍यावर आपण मधाचा वापर करु शकतो.  मध आणि तीळाचे तेल सारख्या प्रमाणात एकत्र करून लेप तयार करून चप्‍पल चावलेल्‍या जागेवर लावावा.  हा लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावा. त्यामुळे पायांना आराम मिळण्यास मदत होईल. जखम मदत होण्‍यास मदत होईल. 

वरील सर्व गोष्‍टी आपल्‍या स्‍वयंपाकघरात असतातच फक्‍त त्‍याचे महत्त्‍व आपणास माहित नसते. या गोष्‍टींचा वापर करा आणि शू बाईट्‍सला करा टाटा..बाय...  बाय...