होमपेज › Youthworld › आजच्या दिवशी ‘हे’ झाले नसते तर मिळाला नसता हक्काचा रविवार!

आजच्या दिवशी ‘हे’ झाले नसते तर मिळाला नसता हक्काचा रविवार!

Published On: Jun 10 2018 6:01PM | Last Updated: Jun 10 2018 6:01PMमुंबई : पुढरी ऑनलाईन

आपला सर्वांचा आवडता वार तो म्हणजे रविवार. लहानमुलांपासुन ते वृद्धापर्यंत सर्वच या रविवारची वाट आतुरतेने पाहत असतात. सुट्टीच्या दिवशी काय करायचे याचे प्लॅनिंग आठवडाभर सुरू असते. पण हा सुट्टीचा दिवस कोणी आणला. ? रविवारच हा सुट्टीचा दिवस कसा ठरला असे अनेकाच्या मनात प्रश्न पडत असतील...मग चला तर पाहुयात या रविवारचा इतिहास....

आपल्या या सुट्टीमागाचे खरे शिल्पकार नारायण मेघाजी लोखंडे हे आहेत.१९ व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात. १० जून १८९० मध्ये भारतीयांना रविवारची पहिली साप्ताहिक सुट्टी मिळाली. १८७५ मध्ये काही शहरांमध्ये ५४ गिरण्या चालू होत्या. दिवसेंदिवस या गिरण्यांसोबत कामगारांची संख्या देखील वाढत चाललेली. लोखंडे यांनी ‘दिनबंधू’ या अंकात एकूण महिला कामगार संख्या, बालकामगारांची संख्या, आणि त्यांच्याकडून किती तास काम करून घेतले जाते या सर्वाचे तपशील प्रसिद्ध केले. 

कामगारांकडू ९ ते १० तास काम करून घेतले जाई. एखाद्या कामगाराला उशिर झाल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जात असे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर लोखंडे यांनी १८८४ रोजी दोन वेळा या गोष्टीवर सभा घेऊन त्यांनी सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या. 

कामाचे तास कमी करा. सर्व कामगारांना आठवड्यातून एकदा सुट्टी मिळावी. महिन्याचा पगार किमान १५ तारखेपर्यंत व्हावा. अशा अनेक मागण्या त्यांनी सरकारपुढे केल्या.  या मागण्या पुर्ण करण्यासाठी चळवळ सुरूच ठेवली. अखेर २४ एप्रिल १८९० लोखंडे यांनी मोठी सभा घेऊन आठवड्याची एकतरी सुट्टी द्या अशी जोरदार मागणी केली. ७ वर्षाच्या लढ्यानंतर लोखंडे यांना  विजय मिळाला. 10 जून १८५० साली रविवार हा आठवडी सुट्टीचा दिवस म्हणूण घोषीत करण्यात आला. 

रविवारच्या सुट्टीचे जनक

Image result for narayan lokhande