Sun, Aug 18, 2019 06:33होमपेज › Youthworld › HUG DAY SPL:  जादूची झप्‍पी दु:ख विसरण्‍यास करते मदत

HUG DAY SPL:  जादूची झप्‍पी दु:ख विसरण्‍यास करते मदत

Published On: Feb 12 2019 9:00AM | Last Updated: Feb 12 2019 9:00AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

सध्‍या व्हलेंटाईन वीकची धूम आहे. व्हलेंटाईन वीक खास बनविण्‍यासाठी बाजरपेठा विविध आकर्षक भेटवस्‍तूंनी सजल्‍या आहेत. व्हलेंटाईन डेचा दिवस खास बनवण्यासाठी प्रेमी युगुल विविध नियोजन करत असतात. पण व्हलेंटाईन डेपूर्वी सात दिवस आधीपासूनच एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो, तो म्‍हणजे १२ फेब्रुवारी या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. व्हलेंटाईन वीक सेलिब्रेशनमधील हा सहावा दिवस खास आहे. या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठीत घेऊन तुमचे प्रेम व्यक्त करता येते. 'हग डे'साठी काही टीप्‍स जाणून घेऊया ..

 'हग डे' साठी काही टीप्‍स

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना येते. 

 आपण प्रेमाने आपल्या जोडीदाराला जवळच्‍या व्‍यक्तीस आलिंगन करुन आपण त्यांना किती प्रेम करता याची जाणीव करुन द्या आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात किती आदर आहे हे देखील त्यांना कळू द्या. 

जोडीदाराला जवळच्‍या व्‍यक्तीस जर आपण पहिल्यांदाच आलिंगन देत असाल तर आपल्या भावनांवर आपले नियंत्रण असू द्या. 

आपल्या प्रेमाचा सहवास त्यांना व्हावा यासाठी आपल्या जोडीदाराला जवळच्‍या व्‍यक्तीसहज आलिंगन देत प्रेम व्यक्त करा आणि त्यांना कळतनकळत जादूची झप्पी द्या. मग पाहा आपल्या पार्टनरच्या डोळ्यात प्रेमच प्रेम दिसेल. असे केल्याने प्रेमाची तर जाणीव होतेच शिवाय आपुलकीदेखील वाढते आणि सकारात्मक विचार मनात येतात असे बऱ्याच संशोधनाद्वारे स्पष्ट झाले आहे. 

प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आलिंगन देतात तर आपण आपल्या अंदाजात नैसर्गिक स्वरुपात मनात कोणतेही विचार न करता असे करा. अशाने जोडीदाराला जवळच्‍या व्‍यक्तीस आपल्या भावना नक्कीच कळतील. 

जोडीदाराला जवळच्‍या व्‍यक्तीस हग करतेवेळी जास्त जोरानेही गळाभेट नको आणि जास्त हलक्यास्वरूपातही नको. आपल्या भावनांची जाणीव व्हावी इतपतच आलिंगन द्यावे.

एक जादूची झप्‍पी सर्व दु:ख विसारयला मदत करते. अशा लहान कृतींमधून जे शब्दांत बोलता येत नाही ते करता येते.