Wed, Oct 24, 2018 01:52होमपेज › Youthworld › मदतीचा हात

मदतीचा हात

Published On: Dec 07 2017 1:43AM | Last Updated: Dec 06 2017 8:24PM

बुकमार्क करा

देणार्‍याने देत जावे,
घेणार्‍याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, 
देणार्‍याचे हात घ्यावे ...

मदत करणारा कोणीही असो तो नेहमी आपल्यासाठी देवदूतच असतो. प्रत्येकाची अशीच अपेक्षा असते की आपण अडचणीत असताना कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावे. पण त्यासाठी अगोदर आपणाला  दुसर्‍याची मदत करावी लागते. ‘रिटन्स’ हा सृष्टीचा नियमच आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉटस्अ‍ॅपवर एक मेसेज आला की या थंडीमध्ये आपल्याकडे  असणारे जुने स्वेटर, जर्कीन, कानटोपी टाकून न देता ती गरजू व गरीब व्यक्तींना द्या किंवा सामाजिक संघटना समाजातील अनाथांसाठी काम करतात त्यांना द्यावीत. 

मित्रांनो,  मेसेज अतिशय साधा होता पण त्याचा फायदा मात्र अनेक गरजूंना होणार आहे. आपण बरेचदा कपडे जुने झाल्यावर फेकून देतो पण हा  विचारही आपल्या मनात येत नाही समाजातील प्रत्येक कुटुंबातून एक जरी हात मदतीला पुढे आला तर कितीतरी अनाथ, गरीब मुलांचा हा हिवाळा उबदार बनू शकेल. गरज आहे फक्त आपल्या परिसरातील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक मंडळे, यांच्यापर्यंत हा संदेश पोहचवण्याची. आशा आहे, सर्व नेटीझम आपापल्या परीने या गरीब मुलांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. 

- नितीन तांबे, वाठार स्टेशन