Wed, Jun 03, 2020 05:49होमपेज › Youthworld › #ashadhiekadashi : विठ्ठलास तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात? 

#ashadhiekadashi : विठ्ठलास तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात? 

Published On: Jul 12 2019 12:15PM | Last Updated: Jul 12 2019 12:09PM
पुढारी ऑनलाईन 

आज आषाढी एकादशी, सर्वजण विठ्‍ठलाच्‍या भक्‍तीत रंगून गेलेले आहेत. आपल्‍या लाडक्‍या विठुरायाला आज सर्वजण तुळसी आणि मंजिरीचा हार वाहतात. मात्र तुळसी आणि मंजिरीचा हार वाहण्‍यामागे  काय महत्‍त्‍व  हे एकादशीनिमित्त जाणून घेऊया.

तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते.

तुळसी आणि मंजिरीचा हार वाहण्‍यामागचे वैशिष्‍ट्ये

तुळशीमध्‍ये श्रीविष्‍णूची स्‍पंदने आकर्षित करण्‍याची शक्‍ती आधिक असते. श्री विठ्‍ठल हे श्रीविष्‍णूचे रुप आहे. विठ्‍ठलाच्‍या मूर्तीला तुळस वाहिल्‍याने ती जागृत व्‍हायला मदत होते. त्‍यामुळे मूर्तीतील चैतन्‍याचा लाभ उपासाकाला होतो. मंजिरी आपल्‍या स्‍पर्शातून विष्‍णतत्‍त्‍वाला जागृत करणारी आहे.

तुळशीची मंजिरी

तुळशीत श्रीकृष्‍णतत्‍त्‍व असल्‍याने तिच्‍या मंजिरीतून उधळल्‍या जाणार्‍या चैतन्‍यामुळे विठ्‍ठलाच्‍या मूर्तीतील चैतन्‍य जागृत होते आणि  त्‍याचे रुपांतर विष्‍णूतत्‍त्‍वात होते, त्‍यातून भक्‍ताला निर्गुणस्‍वरुप चैतन्‍याची अनुभूती येते. 

श्री विठ्‍ठलाच्‍या छातीवर रुळणारा तुळीशीच्‍या मंजिरीचा हार हा मूर्तीच्‍या मध्‍यभागातील स्‍थितीविषयक श्रीविष्‍णूरुपी क्रिया शक्‍तीला चालना देणारा असल्‍याने भाविकांच्‍या सर्व प्रकाराच्‍या मनोकामना पूर्ण होतात. 

तुळशीची वैज्ञानिक माहिती

तुळशीला ‘ऑसिमम टेन्युफ्लोरम’ किंवा ‘ऑसिमम सँक्टम’ अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. तिच्या ऑसिमम अमेरिकन, ऑसिमम वेसिलिकम, ऑसिमम वेसिलिकम मिनिमम, ऑसिमम ग्रेटिसिकम, ऑसिमम किलिमंडचेरिकम, ऑसिमम सँक्टम आणि ऑसिमम विरिडी अशा प्रजाती आहेत. त्यापैकी सर्वसामान्यपणे ऑसिमम सँक्टम ही तुळस प्रधान मानली जाते. सामान्यपणे तिला ‘होली बेसिल’ म्हणून ओळखले जाते. ‘लॅमियासेई’ या कुळातील हे रोप आहे. विशेष म्हणजे तुळशीचे मूळ भारतातच आहे. भारतीय उपखंडातच तिचा जन्म झाला आणि संपूर्ण दक्षिण आशियात ती पोहोचली. थायलंडमध्येही तुळशीचा एक प्रकार आढळतो व त्याचा तिथेही वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. तुळशीचे रोप 12 ते 24 सेंटीमीटरपर्यंत उंच असते. पाने हिरवी किंवा जांभळट रंगाची असतात. हिरव्या तुळशीला ‘श्री’ किंवा ‘लक्ष्मी तुळस’ असे म्हटले जाते तर जांभळट पानांच्या तुळशीला ‘कृष्ण तुळस’ असे म्हटले जाते. भारतीय उपखंडातील तुळशीच्या प्रकाराचे डीएनए बारकोडस्ही आता संशोधकांनी तयार केले आहेत. पंजाबच्या भटिंडातील सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी तुळशीवर मोठेच संशोधन केले आहे. तुळशीत अनेक जैव रसायने आढळतात. त्यामध्ये ट्रॅनिन, सॅवोनिन, ग्लायकोसाईड आणि अल्केलाईडस् हे प्रमुख आहेत. तुळशीत एक विशिष्ट असे पिवळे तेलही असते. शिवाय ‘क’ जीवनसत्त्व आणि कॅरिटीनही असते. तुळशीचे आध्यात्मिक, आयुर्वेदिक महत्त्व लक्षात घेऊन आता युरोप-अमेरिकेतही तुळशीच्या रोपांचे संवर्धन केले जात आहे.