Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Youthworld › जागतिक कॉफी दिनानिमित्त कॉफीचे काही प्रकार तुम्‍हच्‍यासाठी..

कॉफीचे 'हे' प्रकार तुम्‍हाला माहिती आहेत का?

Published On: Oct 01 2018 5:51PM | Last Updated: Oct 01 2018 5:15PMनवी दिल्‍ली :  पुढारी ऑनलाईन 

चहा आणि कॉफी घेतल्‍याशिवाय दिवसाची सुरुवात होवूच शकत नाही, अशी काहीशी अवस्‍था काही जणांची असते. चहा किंवा कॉफी नसती तर  काय झाले असते असा प्रश्‍न पडतो. आपल्यातले अनेकजण 'टी टॉटलर' किंवा 'कॉफीहॉलीक' असतील. कॉफीच्‍या चाहत्‍यांसाठी आज खूषखबर आहे. कारण आज जागतिक कॉफी दिवस आहे. यानिमित्त जाणून घेवूया कॉफीचे काही प्रकार....

कॅफे अमेरिकानो

या कॉफीमध्ये एस्प्रेसोचा सिंगल शॉट किंवा डबल शॉट गरम पाण्यात घालून मिक्स करतात.

Image result for कॅफे अमेरिकानो


कॅफे क्युबानो किंवा क्युबन कॉफी

ही कॉफी एस्प्रेसो मशीनमध्ये साखर व कॉफी घालून कॉफी ब्रु केली जाते.

Image result for कॅफे क्युबानो

कॅफे लाते

ही कॉफी सिंगल एस्प्रेसो शॉट व स्टीम्ड/फोम्ड मिल्क घालून बनवली जाते. यात साखर ही घातली जाते.

Related image

एस्प्रेसो रोमानो

ही कॉफी एस्प्रेसो शॉट, लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह केली जाते. लिंबाची फोड कपाच्या कडेला चोळून ही कॉफी प्यायली जाते.

Related image

कॅपुचिनो

 ही कॉफी एस्प्रेसो, गरम दूध व मिल्क फ्रॉथ सम प्रमाणात घेऊन बनवली जाते.

Image result for कैपुचिनो

Caf au Lait

ही फ्रेंच कॉफी कॅफे लाते सारखीच बनवली जाते फक्त ह्यात एस्प्रेसोऐवजी ब्रुड कॉफी व स्टीम्ड मिल्कचा वापर केला जातो.

Image result for Cafe au Lait

कॅफ मोका (Mochachino)

 ही कॉफी कॅपुचीनो किंवा कॅफे लाते प्रमाणेच बनवली जाते फक्त यात चॉकलेट सिरप किंवा कोको पावडर वरुन घातले जाते.

Image result for coffee

कॅरेमल मकिआतो

ही कॉफी एस्प्रेसो, कॅरेमल, स्टिम्ड किंवा फ्रॉथ्ड मिल्क, व्हॅनिला एसेन्स एकत्र करुन बनवली जाते.

Related image

लाते मकिआतो

किआतो म्हणजे स्टेन्ड. ही कॉफी एस्प्रेसो व हलके फोम्ड मिल्क घालून बनवली जाते.

Galão

 पोर्तुगीज कॉफी एस्प्रेसो व फोम्ड मिल्क घालून बनवली जाते.

Image result for galão

ग्रीक फ्रॅप्पे

 कॉफी कॉकटेल शेकर वापरुन बनवली जाते. ह्यात इंस्टंट कोफी, साखर, आणि थोडेच पाणी घालून ब्लेंड केले जाते. ही फेसाळलेली कॉफी मग उंच ग्लासमध्ये ओतून त्यावर थंड पाई किंवा बर्फ घालून सर्व्ह केली जाते.

Image result for coffee

Einspanner किंवा व्हियेन्ना कॉफी

ही कोफी एस्प्रेसो आणि व्हिप्ड क्रीम घालून त्यावर चॉकलेट, दालचिनी भुरभूरून सर्व्ह केली जाते.

Related image

Eiskaffee

ही कॉफी म्हणजे जर्मनीची आईसक्रिम कॉफी. ही कॉफी थंड दुध, कॉफी, व्हॅनिला आईसक्रिम, साखर आणि व्हिप्ड क्रिम घालून बनवली जाते.

Image result for eiskaffee