Wed, Oct 24, 2018 01:32होमपेज › Youthworld › माणूस..!

माणूस..!

Published On: Dec 07 2017 1:43AM | Last Updated: Dec 06 2017 8:28PM

बुकमार्क करा

काळासोबत बदल स्वीकारण्याच्या अट्टाहासाने अन् विकास व प्रगतीच्या मायाजालात गुरफटलेल्या मनोविकृतीतून अनेकदा संस्कृतीवर घाला घातला जात आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचा व्हायरस गावागावांत अन् घराघरापर्यंत येऊन ठेपलाय. पाश्‍चात्यांच्या अंधानुकरणाचा जडलेला रोग कित्येक चांगल्या रुढी, परंपरांनाही काळाच्या पडद्याआड घेवून चालला आहे. त्यामध्ये माणूस अन् मानवताही धोक्यात येवू लागली आहे. सार्‍यांनाच पैसा कमवायचा आहे, विकासावर स्वार होवून प्रगतीची दारे ठोठावायची आहेत, पण या विकासाचा, प्रगतीचा वेग माणसाच्या मुळावरच आला आहे. त्यातूनच माणूस माणसाला पोरका होत चालला आहे.  पण हे आपल्या लक्षातच येत नाही ना

माणूस म्हणून जगताना..., माणूस माणसाला विसरतोय, 
स्वत:पुरता जगताना..,आनंद लुटताना, आनंद वाटायला विसरतोय.
      इमारतींच्या जंगलात तोही बनलाय हिंस्त्र पशू, 
      माणसाचंच रक्त शोषताना त्याला येतंय खूप हसू.
विसरतोय तो जगाला, त्याला दिसतोय फक्त स्वार्थ,
खर सांगा पाहू, माणूस म्हणून जगायला राहिलाय का हो अर्थ?
     विचारांच्या या चक्रव्युहात कुणी अडकायलाच तयार नाही,
     स्वप्नांचे महाल उभे करता करता, माणुसकीचे इमले कुणी रचलेच नाहीत. 
पण एक दिवस वाटेल गरज, विचार करण्याची,  
खंत असेल तेव्हा मात्र, वेळ निघून गेल्याची.
      म्हणून वाटते प्रत्येकाने करावा थोडासा विचार, 
      मग सहजच होईल ‘माणुसकी’ या गोड नात्याचा प्रचार. 
मग नक्कीच स्वत:बद्दल अभिमान वाटेल, 
माणूस म्हणून जगण्यास आपण पात्र आहेत,
याची तेव्हाच खात्री पटेल.

- क्षितिजा देशमुख (सिद्धेश्‍वर कुरोली)