Fri, Jun 05, 2020 01:08होमपेज › Youthworld › 'स्‍माईली' मागचा खरा चेहरा!

'स्‍माईली' मागचा खरा चेहरा!

Published On: Apr 12 2019 11:06AM | Last Updated: Apr 12 2019 11:53AM
smileyस्‍माईलीचे जनक हार्वे बॉल यांचे १२ एप्रिल २००१ मध्‍ये निधन झाले. स्‍माईलीला रुप देण्‍याचे काम करणारे कलाकर हॉर्वे रॉस बॉल जरी या जगात नसले तरी त्‍यांनी बनविलेली स्‍माईली आजही जगभरातील करोडो लोकांच्‍या चेहर्‍यावर हासू निर्माण करते. आजच्‍या दिवशी जाणून घेऊया स्‍माईलीच्‍या निर्मितीची अनोखी कहाणी...smiley

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

व्‍हॅटस्ॲप , फेसबूक, इंस्‍टा, ट्‍वीटरचा याचा वापर करताना आपण दररोज शंभरभर संदेश पाठवतो आणि वाचातोही. पण या सगळ्‍या संदेशामध्‍ये एक गोष्‍ट मात्र कॉमन असते. त्‍याचा वापर केल्‍याशिवाय कोणताही संदेश पूर्णच होत नाही. पण ही गोष्‍ट अशी आहे की, ती पाहिल्‍यावर प्रत्‍येकाच्‍या चेहर्‍यावर आनंदाची झालर तयार होते. अस काय आहे ते सोशल मीडियावर आपण एवढ्‍या मोठ्‍या प्रमाणात वापरतो. smileysmiley


आपल्‍या दररोज वापरात येणार्‍या या गोष्‍टीची नाव आहे 'स्‍माईली' ताई. या स्‍माईलचा वापर केल्‍याशिवाय आपला कुठलाच संदेश, मेसेज परिपूर्ण होत नाही. शब्‍दांची जागा या स्‍माईलींनी घेतले असे म्‍हटले तरी वावगे वाटायला नको. धावपळीच्‍या जगात या स्‍माईलीच चेहर्‍यावर आनंदाची लाट निर्माण करतात. पण याची निर्मिती कोणी केली आहे, असा प्रश्‍न कधी पडला आहे का...जाणून घेवूया 'तिच्‍याविषयी'....smileysmiley

हॉर्वे रॉस बॉल यांनी स्‍माईलीला खरे रुप, आकार दिला. स्‍माईलीला रुप देण्‍याचे काम करणारे कलाकर हॉर्वे रॉस बॉल जरी या जगात नसले तरी त्‍यांनी बनविलेली स्‍माईली आजही जगभरातील करोडो लोकांच्‍या चेहर्‍यावर हासू निर्माण करते. १२ एप्रिल २००१ मध्‍ये हॉर्वे रॉस यांचा मृत्‍यू झाला.

१९६३ मध्‍ये स्‍माईलीला हार्वे यांनी दिला आकार smileysmiley

मेसाचुसेट्‍स मध्‍ये १० जुर्ले १९२१ मध्‍ये हार्वे यांचा जन्‍म झाला. दुसर्‍या महायुद्‍धाच्‍यावेळी अशिया आणि पॅसिफिक यांच्‍याकडून हार्वे यांनी या युद्‍धात सहभाग घेतला होता. त्‍यांना बाहदूरीसाठी कास्‍यपदक देण्‍यात आले आहे. युद्‍ध संपल्‍यानंतर हार्वे यांनी  हार्वे बॉल जाहिरात कंपनीची स्‍थापना केली. १९६३ मध्‍ये कंपनीने हार्वे यांना असे चित्र काढण्‍यास सांगितले ज्‍याचा वापर बटनावर करण्‍यात येईल. त्‍याच्‍यवेळी हार्वे यांनी पिवळ्‍या रंगाच्‍या स्‍माईलिचे चित्र काढले. तेव्‍हापासून ते आजपर्यंत 'ती' स्‍माईली लोकांच्‍या हास्‍याचे कारण ठरत आहे.

स्‍माईली बनविण्‍यास लागले होते केवळ १० मिनिटेsmileyindecision

त्‍यावेळी त्‍यांना स्‍माईली बनविण्‍यासाठी ४५ डॉलर मिळाले होते. ही स्‍माईली बनविन्‍यासाठी हार्वे यांना फक्‍त १० मिनिटे लागले होते. १० मिनिटाची स्‍माईली आज जगभरात प्रसिद्‍ध झाली आहे. प्रत्‍येकाच्‍या मोबाईल फोनमध्‍ये या स्‍माईलीची जागा फिक्‍स आहे आणि तिचा वापरही सरास सगळे करताना दिसतात. स्‍माईलीचा अर्थ आहे की, समाजात उत्‍साह निर्माण करणे व आनंद निर्माण करणे पण सोशल मिडियाच्‍या जगात मात्र याचा मूळ अर्थ विसरले आहेत. पण तरीही स्‍माईली पाहिल्‍यानंतर काही क्षणासाठी का असेना पण चेहर्‍यावर हास्‍य फुलते हेही तितकेच खरे आहे.smileysmiley