Thu, Nov 15, 2018 11:21होमपेज › Youthworld › रातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते?

रातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते?

Published On: Feb 12 2018 6:12PM | Last Updated: Feb 12 2018 6:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी किंवा केवळ एका गाण्यामुळे स्टार होण्याचे भाग्य काहीच जणांना मिळते. मळ्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या एका व्हिडिओमुळे अशीच चर्चेत आली आहे. ऐरवी दाक्षिणात्य चित्रपटांकडे भाषेच्या मर्यादेमुळे पाठ वळवणारे ‘ओरू आदर लव्ह’ या चित्रपटातील एका प्रियाच्या आदांनी मात्र घायाळ झाले आहेत.    

Viral : ‘इशारों-इशारों मे’ प्रपोज करणारा व्हिडिओ 

‘ओरू आदर लव्ह’ मधील ‘मनिक्य मलाराल पूर्वी’ या गाण्याला 53 लाख 61 हजारांच्यावर व्ह्यू मिळाले आहेत. सोशल मीडियावर देखील या गाण्यामधील 26 सेंकदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या गाण्यातील प्रियाच्या एक्सप्रेशनवर केवळ केरळ नव्हे तर संपूर्ण देशात तिचे चाहते निर्माण झाले आहेत.

चित्रपट प्रदर्शन होण्याआधी मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल प्रियाने ट्विटरवरून चाहत्यांचे आभार मानले आहेत. माझा पहिला चित्रपट राष्ट्रीय पातळीवर ट्रेंडमध्ये येईल असे वाटले नव्हते. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खुप खुप आभारी, असे तिने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

Image may contain: 1 person, smiling, text

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून प्रियाबद्दल माहित करुन घेण्यासाठी नेटिझन्स इंटरनेटवर बराच वेळ खर्च करत आहेत. ट्विटरवर #PriyaPrakashVarrier  हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आहे. वयाच्या 18व्या वर्षी प्रियाचा हा पहिल्याच चित्रपट आहे.  

सोशल मीडियावर प्रियाचे फेक अकाउंट

अचानक चर्चेत आलेल्या प्रियाचे सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट तयार झाली आहेत. यातील ओरिजनल प्रिया कोण असा प्रश्न प्रियाच्या चाहत्यांना पडला होता. अखेर प्रियाने एका व्हिडिओद्वारे तीचे ओरिजनल अकाउंट कोणती आहेत हे सांगितले.