Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Youthworld › ॲन्ड्रॉईड ८.१ देणार जादा स्पेस

ॲन्ड्रॉईड ८.१ देणार जादा स्पेस

Published On: Nov 13 2017 8:54PM | Last Updated: Nov 13 2017 8:54PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सर्व ॲन्ड्रॉईड वापरणाऱ्यांसाठी मोबाईल मेमरी स्टोरेजचा खूप मोठा प्रश्न असतो. इनॲक्टीव्ह ॲप्स विनाकारण फोनची मेमरी वाया घालवतात. यावर गूगलने ॲन्ड्रॉईड ८.१ मध्ये उपाय केला आहे. या ऑपरेटींग सिस्टिममध्ये अनेक फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. गूगलने मोबाईलमधील मेमरी जास्त वापरता येईल असे फिचर ८.१ मध्ये ॲड केले आहे. अनेक मोबाईलमध्ये इनबिल्ट मेमरी कमी असते. तेव्हा ॲप्ससाठी वापरल्या जाणाऱ्या मेमरीमुळे स्टोरेजसाठी कमी मेमरी शिल्लक राहते. 

ॲन्ड्रॉईड ८.१ मध्ये कमी मेमरी असलेल्या फोनची मेमरी ॲटो डिटेक्ट करते. आणि इनॲक्टीव्ह ॲप्स कमी करुन मेमरी रिकामी करते. ज्या ॲप्सचा वापर केला नसेल त्या ॲप्सना शोधण्याचे काम या फिचरमधून केले जाते. 

या फिचरला प्रत्यक्षात येण्यासाठी अजून वेळ आहे. सध्या ८.० मधील टेस्टिंग सुरु आहे.  या फिचरमुळे मोबाईलवर लो स्पेस स्टोरेचे नोटीफिकेशन सारखे सारखे येणार नाही.