होमपेज › Youthworld › दोन देशांचे राष्ट्रगीत लिहणारे रवींद्रनाथ टागोर

दोन देशांचे राष्ट्रगीत लिहणारे रवींद्रनाथ टागोर

Published On: Jun 06 2018 11:33PM | Last Updated: Aug 07 2018 9:21AMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आशिया खंडातील साहित्यातील पहिले नोबेल विजेते, दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिणारे, कवी, कांदबरीकार, नाटककार, चित्रकार असलेले रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्‍मृतिदिन. कोलकत्ता येथे जन्‍मलेले मात्र टागोर यांची बालपणापासून कवितेच्या प्रांतात मुसाफिरी आहे. कवितांसह त्यांनी संगीत, कला आणि शिक्षण क्षेत्राला आपले योगदान दिले. त्यांच्या गीतांजली या काव्‍यसंग्रहाला नोबेल पुरस्‍काराने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले. अशा या मानवतावादी कवी, शिक्षक, संगीतकार, तत्‍ववेत्याचा आज स्‍मृतिदिन.

रवींद्रनाथ टागोर हे जगातील असे एकमेव कवी आहेत ज्यांच्या कविता दोन देशांनी आपले राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या आहेत. भारताचे जन-गण-मन आणि बांगलादेशचे आमार सोनार बांगलादेश या रचना त्यांनी केलेल्या आहेत. नोबेल पुरस्कोर विजेते कवी, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ ला कोलकत्ता येथे झाला. मानवतावादी विचारांच्या रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्य, संगीत, कला आणि शिक्षण क्षेत्रात अमुल्य असे योगदान दिले. 


रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या आई-वडिलांच्या १३ अपत्यांमध्ये सर्वात लहान होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहली तर सोळाव्या वर्षी कथा आणि नाटक लिहण्यास प्रारंभ केला होता. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहणे आवडायचे. विद्यार्थ्यांनीदेखील निसर्गात राहून शिकले पाहिजे म्हणून त्‍यांनी शांती निकेतनची स्थापना केली होती.

लहानपणापासूनच रवींद्रनाथ टागोर यांनी देश विदेशातील साहित्य, दर्शन, संस्कृती समजून घेतली होती. त्यांच्या साहित्य क्षेत्रात भरीव असे योगदान दिले. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला साहित्यातील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच होते. 

रवींद्रनाथ टागोर हे कोलकत्ता आणि आसपासच्या परिसरातच राहिले. वयाच्या ५१ व्या वर्षी मुलाकडे इंग्लंडला समुद्रमार्गे जाताना त्यांनी स्वत:च गीतांजलीचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांनी अमेरिका, ब्रिटन, जपान, चीनसहीत इतर अनेक देशांचा प्रवास केला. वयाच्या ८० व्या वर्षी ७ ऑगस्ट १९४१ मध्ये त्यांचे निधन झाले.