Wed, Oct 24, 2018 02:47होमपेज › Youthworld › गेट टुगेदर

गेट टुगेदर

Published On: Dec 07 2017 1:43AM | Last Updated: Dec 06 2017 8:31PM

बुकमार्क करा

हाय फ्रेंडस्, 
हल्लीचं जगणं कसं स्ट्रेसफुल, स्पिडफुल झाले आहे. यामध्ये तुम्हाला निडफुल काय आहे? याचा विचार कमीच होतो. धावताधावता थकून जाताना मग कोठेतरी विरंगुळा शोधला जातो. चार मित्रांच्या संगतीने कोठेतरी फेरफटका होतो किंवा गेट टुगेदरची आयडीया कोणीतरी सुचवतो मित्रमैत्रिणींच्या गेट टुगेदर बरोबरच आता रिलेटिव्ह गेट टुगेदर करूनही वंशावळींची नाळ जपण्याचा एक सुरेख संगम हल्ली अनेक ठिकाणी साधला जात आहे. 

जत्रा, यात्रा, सण, उत्सवाद्वारे एकत्रिकरण व्हावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, एनर्जी निर्माण व्हावी म्हणूनच या उत्सवांचे नियोजन अगदी पूर्वीपासून केले गेले आहे. यातून समाजाचे एकत्रिकरण होतेच पण याहीपेक्षा कोणताही सण, उत्सव नसताना केवळ एकमेकांना भेटण्यासाठी हल्ली ‘गेट टुगेदर’ अ‍ॅरेंज केली जातात. मित्र, मैत्रिणींच्या गेट टुगेदरबरोबरच आता रिलेटिव्ह गेट टुगेदर ही कल्पनाही समाजप्रिय होत आहे. मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे कोणी म्हटले आहे हे खरेही आहे. त्यामुळेच तर नाही का आपण वर्षभरात अनेक सण, उत्सव साजरे करतो. जोश, जल्लोष, उत्साह, नवी उमेद, आनंद मिळवण्यासाठी या उत्सवांमध्ये रमलेलो असतो. 

रिलेटिव्ह टुगेदर येणं म्हणजे काय की, कोणाला त्याचं आजोळपण कळतं, कोणाला आजी, पणजोबाची उब कळते, कोणाला भाऊबहिणींची माय कळते तर कोणाला या नात्यांमधील असणारी आपलुकी फिल करून जाते. सो, हे आपलेपण कळण्यासाठी असा गेट टुगेदर हवाच. फ्रेंडस, फ्रेंडसर्कलच्या गेट टुगेदरमध्ये ओन्ली एन्जॉय केला जातो, बिझनेस टुगेदर मध्ये फॉरमॅलिटी जपली जाते, पण आपलेपण कळण्यासाठी, जगण्यासाठी, जपण्यासाठी रिलेटिव्ह  टुगेदर येणं निडफुल है. 

फ्रेंडस्, कॉलेज, नोकरीच्या निमित्ताने अनेक लोकांना तुम्ही भेटत असाल पण आपुलकी फार कमी जपली जाते. राहणीमान उंचावलं असलं तरी जगणं मात्र दळभद्री झाले आहे. भले चंद्र, मंगळावर जाण्याच्या गप्पा मारतो पण शेजारी आलेल्या नवीन माणसाची चौकशी करत नाही. जगण्यासाठीची लढाई करत केवळ धावतच असतो. आपण खूप ‘स्मार्ट’ झालो आहोत असे उगाचच वाटत राहते. त्यातून मग आपल्या नात्यांची वीण घट्ट झालीये, सैल पडलीये की खरंच त्यात  अर्थपूर्ण बदल होताहेत? आपल्या स्वप्रतिमांचा घोळ वाढला आहे की कमी झाला आहे? आभासी जग आणि खरं जग यातलं अंतर धूसर होतंय की यातला फरक कळेनासा झालाय. यातलं खरंतर काहीच कळत नाही. कारण आपण माणुसकी हरवत आहोत, आपलेपण हटवत आहोत. 

फ्रेंडस्, या होल दुनियेमध्ये तुम्ही बहुतसारी फ्रेंडशिप जपा, पण नात्यातील गोडवा, हळवेपणा विसरू नका. यासाठीच नात्यानात्यातील वीण जपण्यासाठी रिलेटिव्ह गेट टुगेदर हवेच.

- प्रतिभा राजे