Fri, Mar 22, 2019 04:00
    ब्रेकिंग    होमपेज › Youthworld › लिपस्टीक वापरताय जरा सांभाळूनच...

लिपस्टीक वापरताय जरा सांभाळूनच...

Published On: Apr 17 2018 1:43PM | Last Updated: Apr 17 2018 1:43PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सौंदर्यप्रसाधने हे एक साधन महिलांच्या विश्वातील अविभाज्य गोष्टच आहे. सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिला ही विविध साधनांचा वापर करत असते. पण कधी कधी ते घातक ही ठरू शकते. ते कशापासून बनवले जाते, कसे तयार केले जाते, याचा विचार न करता वापरण्यात गुंग असलेल्या महिलांना लिपस्टीक कशी बनते  माहिती आहे का? 

भारतामध्ये लिपस्‍टीकची बाजारपेठ ४० हजार कोटी इतकी आहे. लिपस्‍टीक हे सौंदर्यप्रसाधन बनवताना प्राण्यांचे विष्टेचा समावेश केला जातो ही बाब अमेरिकन पोलिसांच्या लक्षात आली. सीएनएन या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तनुसार, सौंदर्यप्रसाधनाचे अनेक ब्रॅडसमध्ये प्राण्यांच्या विष्टेचा वापर केला जातो. त्यामध्ये मॉडेल काइली जेनरच्या ‘कायली’ या ब्रॅडचा ही समावेश आहे. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने सौदर्यप्रसाधानाचे परीक्षण केले असता असे लक्षात आले की, या सौंदर्यप्रसाधनांमध्ये जीवाणू आणि प्राण्यांच्या विष्टांचा समावेश असतो. पोलिस निरीक्षक मार्क रीना यांनी सांगितले की, सेंटी एली येथे २१ ठिकाणी छापे मारण्यात आले असता ७ लाख डॉलरचे भेसळ सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आले.  

मॉडेल काइली जेनरची बहिणी किम कार्दशियनने या छाप्यासंदर्भात एक ट्विट केले आहे. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने सांगितल्यानुसार जप्त झालेली काइली लिपस्टीक परीक्षणात प्राण्यांची विष्टा मिसळल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशी भेसळ सौंदर्यप्रसाधने कधी खरेदी करू नका, असे तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

 

Tags : lipstick,  Police Raid, Fake, beauty care, cosmetic