Thu, Apr 25, 2019 11:21होमपेज › Youthworld › डोन्ट वरी..बी हॅप्पी

डोन्ट वरी..बी हॅप्पी

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 8:42PMजीवनातील प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे. मनातले सर्व अपराधी भाव, भूतकाळी, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे फेकून द्या. मोकळे आणि रिते व्हा. प्रत्येक क्षणाला निरापराध वृत्तीने निरागसपणे सामोरे जावा.

आयुष्यातील सर्व दु:खे, समस्या  चुटकीसरशी  ‘छुमंतर’  म्हटल्याबरोबर पळून जातील. यासाठी त्रिसूत्री पाळली तर नक्कीच फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल यात कसली त्रिसूत्री. मला माहिती आहे मित्रांना पण काही गोष्टींची आपल्याला प्रचिती आल्यावरच  विश्‍वास बसतो. यामध्ये पहिली गोष्ट  आपण पाळावी,   ती म्हणजे कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्‍चर्याने बघा.   या वा वाक्याने तुम्ही गोंधळात पडला असाल ना. म्हणजे बघा एक उदाहरण घेऊ यात. समजा दुकानदार आहे. आणि त्याच्याकडे  दुकानात आज नोकर नाही आला तर ‘ अरे वा ..बघूयात आज काय काय अडतंय त्याच्यावाचून.  आज घरी कामवाली नाही आली तर असं का मज्जा आहे मग आज , महिन्यातला शेवटचा आठवडा सुरु आहे, पैसे संपत आलेत  छान मस्त काटकसर करुयात पाचसहा दिवस एखादा आपल्यावर निष्कारण चिडला आहे जर मग ‘ हो का? किती मज्जा आता रुसवा काढायची संधी मिळणारा’ असा आश्‍चर्य व्यक्त करा म्हणजे त्या गोष्टीचे दडपण येणार नाही. त्यातून निराशाही येणार  नाही.

बघा कसलीही कितीही भयान गोष्ट  किंवा समस्या आसू द्या ह्या फॉर्मेटमध्ये   ठेवून बघा, आश्‍चर्य व्यक्त केल्यास सतस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते. ओह, हे असं आहे का? अरे, हे असंपण असतं का? ओके. आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळून जातात.  समजा एखादा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे  कसा मार्ग काढायचा एम उपाय आहे त्यावरही.  डोळे बंद करुन त्या दुखणार्‍या दताकडे संपूण लक्ष द्या. त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा आणि वेदनांची तीव्रता कमी होईल.

गंमत अशी आहे की प्रत्यक्ष वेदनेपेक्षा मनात वेदनेमुळे येणारे विचार  जास्त्र त्रासदायक असतात.  वेदनांना विचारापासून तोडले की चिंता पळून जाते.

फ्रेश राहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे भूतकाळात घुटमळणे बंद करा. बसल्या बसल्या आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते. दहावर्षापूवी मी चांगला अभ्यास केला असता तर आज मीही खूप मोठ्ठा ऑफिसर असतो.  काही वर्षांपूर्वीच मी शहरात फ्लॅट घ्यायला हवा होतो, मी अमूक करायला हवे होते, अमूक कार्यक्रमात अमूक व्यक्ती मला असे म्हणाली, अशा भूतकाळातील गोष्टी आठवून पश्‍चाताप करण्याने  दु:खात भर पडत असते. अरे व्हायच्या  त्या घटना होणारच. त्या घडल्यानंतर आपण काही टाईममशीनमध्ये जावून त्या बदलणार नाही ना.  त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त आपली बहुमूल्य ऊर्जा वाया घालवायची कशाला?

जीवनातील आणखी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे. तेम्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेव व्दितीय आहे.  बहुतांश दु:खाचे मूळ हे  तुलनेत असतं. त्यांचं पॅकेज मोठं आहे. मला कधी मिळणार एवढं पॅकेज. त्यांच्याकडे  चांगली ब्रॅण्डची गाडी आहे, माझ्याकडे कधी येणार? ते शहरात अलीशान बंगल्यात राहतात. मी छोट्याशा गावात, ती किती स्लीमड्रीम आहे, माझं वजन  थोडं जास्तच आहे इत्यादी. 

ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेव अव्दितीय आहे. गुलाब सुद असतो म्हणून मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही. त्याचा सुगंध ही त्याची ओळख आहे.  तुलना  येणार नाही.  फळामध्येही प्रत्येकाची चव, गोडी वेगळी आहे. म्हणून एकाने दुसर्‍याशी तुलना करुन आत्महत्या करावी का? 

जसं फळांचं तसच माणसाचं आहे. कोणी शार्प आहे, कोणी स्मार्ट आहे, कोणी बिझनेसमन आहे, कोणी कलाकार आहे, कोणी प्रेमळ आहे, कोणी शिस्त प्रिय आहे. कोणी यशासाठी तरी कोणी प्रेमासाठी भूकेला आहे. एकाची दुसर्‍यागोष्टीशी तुलना होवू शकत नाही. आयुष्य कशासाठी आहे? याचं उत्तर शोधा. आयुष्य निर्भेळ आनंद घेण्यासाठी मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फिरकणारसुध्दा नाही. 

-डॉ. वंदना भोसले, डिस्कळ