Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Youthworld › दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 8:39PMरविवारी  सर्व तरुणाई  ‘फ्रेंडशीप डे’च्या उत्सवात न्हाऊन निघाली. त्यामुळे खर्‍या अर्थान सर्वांचा ‘हॅप्पीवाला सन्डे’   सेलिब्रेट झाला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये नव्याने पाऊल ठेवलेल्या तरुणाईसाठी हा एक मस्त इव्हेंट होता. त्यांनी तो एन्जॉयही केला. आजकालच्या मुलांना इंटरनेटमुळे ऑर्कूट, फेसबुक, व्टीटर, मॅसेंजर, जी टॉक, व्हाटस्अ‍ॅप या माध्यमांनी जवळ आणलंय. मित्र -मैत्रिणी दूर असले तरी सोशल मीडियातील विविध साधनांमुळे एकमेकांमधील अंतर कमी झाले.  फ्रेंडशीपडेच्यानिमित्ताने कित्येक मैत्रीची नाती फ्रेंडशीप बेल्टमध्ये धट्ट बांधली गेली आहेत.  म्हणूनच मैत्रीबद्दल   कोणीतरी म्हटले आहे की  ‘दिल दोस्ती दुनिया दारी’

या  दिल दोस्तीची झलक  ‘फ्रेंडशीप डे’मध्ये पहायला मिळाली. माध्यमिक, उच्च माध्यमिकपर्यंत टिकून असलेली मैत्री उच्चशिक्षणाच्या मार्गावर विभक्त होते.  नवीन कॅम्पसमध्ये नवीन मैत्री कट्टा  तयार होतो. या मैत्रीला मूर्त रुप फ्रेंडशीपच्या बॅण्डमुळे प्राप्त होते. दिवसेंदिवस वाढणारं टेन्शन घालवण्यासाठी फ्रेंडशीपसारखा दुसरा कोणताही चांगला आधार नाही. दशकापूर्वीपासून भारतात आलेलं मैत्रीचं हे जहाज अर्थात फ्रेंडसचं शीप आता मित्र-मैत्रिणींच्या अथांग समुद्रात स्थिरावले आहे. 

मैत्री म्हणजे नवं नातं. नातंं असं की ते जपण्यासाठी आपण जीवाची ही पर्वा नाही करत. ते टिकवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण हे नातं खरचं टिकवायचं असेल तर मैत्रीचा एक नियम पाळला पाहिजे, तो म्हणजे मैत्रीत कोणत्याही अटी, शर्ती नसाव्यात. वयाचं बंधन नसावे. आई असो किंवा बाबा, ताई असो की दादा प्रत्येकाचे मित्र -मैत्रिणी असतातच. पूर्वीच्याकाळात असलेलं आई-वडिल आणि मुलं यांच्यातील अंतरही कमी झालयं. दोघेही मुलांशी मित्रत्वाने वागू नलागले आहेत. तसं वागण्याचा प्रयत्न तरी करत आहेत. याला काही अपवादही असतील. याचा परिणाम चांगलाच दिसत असून दोन पिढ्यांमधील दुरावा म्हणजेच जनरेशन गॅप कमी होत असल्याचेच यातून जाणवत आहे. 

आपल्या हातून काही चूक झाल्यास पाठीवरुन प्रेमाच्या मोरपीसाने  हात फिरवणारी आई आणि पुन्हा असं करु नकोस असं म्हणणारे बाबा आपल्याला सांभाळुन घेतात. मुलं सुध्दा लवकर परिपक्व होत आहेत. योग्य-अयोग्य यातील फरकही त्यांना समजू लागलाय. मात्र काही असले तरी सर्व पिढीतील  ताण-तणाव कमी झालेले नाहीत. गरिबांना गरिबीचं, श्रीमंतांना श्रीमंतीचं, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरदार वर्गाला कामाचं. ज्याल त्याला ज्याचं त्याचं टेन्शन  आहेच.  सगळेे ताण तणाव कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठीचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री किंवा मैत्री कट्टा होय. मनातील अगदी स्पेशल गोष्टीही शेअर करण्यास मुक्त व्यापीठ म्हणजे ही मैत्री गँग असते. वेळ आली तर मैत्रीसाठी काही पण करण्यास तयार असणारे  आणि जीवला जीव देणारे मित्र या गँगमध्ये असतात. त्यांच्या मैत्रीला सलाम कराताना म्हणावेच लागेल ‘दिल दोस्ती दुनियादारी’.

-मीना शिंदे