Thu, Nov 14, 2019 07:49होमपेज › Youthworld › आषाढी एकादशीनिमित्‍त उपवासाची मिसळ 

आषाढी एकादशीनिमित्‍त उपवासाची मिसळ 

Published On: Jul 12 2019 11:45AM | Last Updated: Jul 12 2019 11:24AM
पुढारी ऑनलाईन  

उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वेफर्स आणि फळं खाण्याचा संकल्‍पना आता मागे पडत आहे. उपवासाला तेच तेच पदार्थ खायला नको वाटतात. सर्वांना प्रश्‍न पडतो की उपवासाला असं काय नवीन बनवायच ज्‍यामुळे उपवास अजून चविष्‍ट बनेल. यासाठी पर्याय म्‍हणून वेगवेगळ्या उपवासाच्‍या रेसिपी हा ट्रेंड येत आहे. उपवासाची इडली, आप्पे, डोसे, वडे, थालीपीठ  तर केले जाते. पण उपवासाला मिसळ चालू शकते, तुम्‍हाला आश्‍चर्य वाटेल पण उपवासाची मिसळ पण आपणास घरच्‍या घरी करता येईल. आता प्रश्‍न पडला असणार की ही उपवासाची मिसळ कशी करायची. यासाठी जाणून घ्‍या उपवासाची मिसळ बनवण्‍याची रेसेपी...

 उपवासाची मिसळ बनविण्‍यासाठी लागनारे साहित्य : 

1. साबुदाण्याची खिचडी,  बटाट्याचे उकडलेले काप किंवा बटाट्‍याची भाजी, बटाट्‍याचा किस तसेच रताळीचा किस, रताळीचे काप पण वापरु शकता. 
2. दही
3. हिरवी मिरची किंवा लाल मिरची पूड, जिरं आणि मिठाचा मिक्सरमध्ये फिरवलेला ठेचा आवडीनुसार 

बटाट्याची शेव किंवा वेफर्स आवडीनुसार वपरु शकता, तसेल चिरमिरी पण आपण वापरु शकतो.  

4. साबुदाणा तळून केलेला नायलॉन चिवडा 

5. खारे किंवा तेलात तळलेले शेंगदाणे 

6. बारीक चिरलेली काकडी 

7. शेंगदाण्याची आमटी 

8. चवीनुसार मीठ,  साखर 

9. लिंबू , आमसूल,  आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे

शेंगदाणा आमटी कृती :

भाजलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप घालून त्यात जिरे तडतडवून घ्या. त्यात शेंगदाण्याचे वाटण, मीठ आणि चवीपुरती साखर घाला. जराशी आंबट चव आवडत असेल तर दोन-तीन आमसूल टाका आणि आमटी उकळल्यावर गॅस बंद करा. 

Image result for shengdanyachi amti

एका खोलगट डिशमध्ये खिचडी, बटाट्याचे तुकडे, रताळीचे काप टाका.  त्यावर चमचाभर साबुदाणा चिवडा, थोडीशी बटाट्याची शेव, कुस्करलेले वेफर्स,  चिरीमिरी, चमचाभर दही घाला. त्यावर मिरचीचा ठेचा,  चिरलेली काकडी, खारे किंवा तळलेले शेंगदाणे आवडीनुसार घाला. हवं असल्यास लिंबू पिळा. या मिसळीसोबत गरमागरम शेंगदाण्‍याची आमटी घ्‍या. मिसळ एकजीव करण्यासाठी आवडीनुसार त्यात आमटी घेता येते. आवडत असल्यास त्यात डाळिंबाचे दाणेही घालता येतील. ­­­अशी उपवासाची मिसळ नक्‍की घरी बनवता येईल.