Wed, Jan 23, 2019 06:09होमपेज › Vishwasanchar › टीव्हीवर अँकरऐवजी दिसणार व्हर्च्युअल न्यूज रीडर

टीव्हीवर अँकरऐवजी दिसणार व्हर्च्युअल न्यूज रीडर

Published On: Nov 09 2018 9:26PM | Last Updated: Nov 10 2018 1:17PMबीजिंग ः चीनची सरकारी न्यूज एजन्सी ‘शिन्हुआ’ने गुरुवारी एक व्हर्च्युअल न्यूज रीडर सादर केला. हा वृत्तनिवेदक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काम करतो. शिन्हुआने सुमारे दोन मिनिटांचा एक व्हिडीओही आपल्या ट्विटर अकौंटवर पोस्ट केला आहे. हा कृत्रिम वृत्तनिवेदक एखाद्या व्यावसायिक वृत्तनिवेदकासारखेच बातम्या वाचून दाखवेल. यामुळे निर्मिती खर्चही कमी होईल, असा शिन्हुआचा दावा आहे.

या न्यूज अँकरचा आवाज व्यावसायिक न्यूज अँकर माणसासारखाच असून त्याच्या ओठांच्या हालचाली व चेहर्‍यावरील हावभावही हुबेहूब मानवी आहेत. प्रथमदर्शनी हा वृत्तनिवेदक कुणालाही एखाद्या व्यावसायिक वृत्तनिवेदकासारखाच वाटतो. तो वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनेलसाठी सतत 24 तासही काम करू शकतो. यामध्ये अधिक खर्चही येत नाही. वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज सांगण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो. हा व्हर्च्युअल अँकर बनवण्यासाठी चिनी सर्च इंजिन ‘सोगो’ची भूमिका महत्त्वाची आहे. ‘सोगो’ने यासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले होते. हा व्हर्च्युअल अँकर म्हणजे एखादा रोबो किंवा माणसाचे थ्रीडी डिजिटल मॉडेल नाही. हे एक अ‍ॅनिमेशन असून ते हुबेहूब माणसासारखेच दिसते.