Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Vishwasanchar › कंगनाचा सहकार्‍यांना टोमणा!

कंगनाचा सहकार्‍यांना टोमणा!

Published On: Aug 10 2018 10:24PM | Last Updated: Aug 10 2018 9:43PMमुंबईः

काही पूर्वग्रहदूषित कलाकार सोशल मीडियात आपली एकांगी मते हिरीरीने व्यक्त करीत असतात. एखाद्या गोष्टीची आपल्याला काडीचीही माहिती नसताना अनेक कलाकार आपली अक्कलही पाजळत असताना दिसतात. मात्र, हेच कलाकार ज्या गंभीर विषयांवर व्यक्त होणे अपेक्षित असते, तिथे मात्र मूग गिळून गप्प राहतात. कलाकारांच्या अशा दुटप्पीपणावर आता फटकळपणासाठीही प्रसिद्ध असलेली ‘क्वीन’ कंगना रणौतने बोट ठेवले आहे. आपल्या सोयीनुसारच बोलण्यासाठीच तुम्हाला स्टारडम मिळालेलं नाही, असा सणसणीत टोमणा तिने हाणला आहे! एका मुलाखतीत कंगना म्हणाली, देशातील धगधगत्या प्रश्‍नांवर जर सेलिब्रिटींनीच मौन बाळगलं तर त्यांचं कॅमेर्‍यासमोर येणं काहीच उपयोगाचं नाही. सेलिब्रिटी म्हणून त्यांना मिळालेलं यशच अर्थहीन ठरतं. तुमच्या सोयीनुसारच बोलण्यासाठी स्टारडम मिळालेलं नाही. काही घटनांना हे सेलिब्रिटी सामोरे जात नाहीत आणि यावर बोलणं टाळतात. माझ्या सहकार्‍यांचं बोलणं मी बर्‍याचदा ऐकलं आहे. आम्हाला तर वीज किंवा पाणी यासंदर्भातील समस्याच नाहीत तर आम्ही अशा विषयांवर का बोलावं? असे त्यांचे म्हणणे असते. त्यांच्या अशा बोलण्याने मला फार त्रास होतो. लोकांचा असा दृष्टिकोन मला पटत 
नाही.