Wed, Apr 24, 2019 09:45होमपेज › Vishwasanchar › जान्हवीला आले टेन्शन!

जान्हवीला आले टेन्शन!

Published On: Jul 11 2018 10:22PM | Last Updated: Jul 11 2018 10:22PMमुंबई :

श्रीदेवीची थोरली कन्या जान्हवी कपूर आता ‘धडक’मधून पदार्पण करीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असल्याने सध्या ती टेन्शनमध्ये आहे. ‘लोकांना काय माहिती की, माझ्या मनावर किती दबाव आहे! मात्र त्यांनी जर मला एक संधी दिली, तर मी काय काय करू शकते हे दाखवेन.’ असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. 

‘धडक’ हा मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. त्याचा ट्रेलर किंवा गाणी पाहून अनेकांनी ‘सैराट’च्या तुलनेत तो थिटा ठरत असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियात या चित्रपटाला सातत्याने ट्रोल केले जाते. तसेच जान्हवी ही एक स्टार किड असल्याने तिला सहज संधी मिळाली, असेही म्हटले जाते. याबाबत एका मुलाखतीत तिला प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावेळी तिने सांगितले, मी इथेपर्यंत सहजपणे पोहोचले असेच लोकांना वाटत असेल. मी अन्य नवोदितांप्रमाणे स्ट्रगल केला नाही, असेही त्यांचे म्हणणे असेल. मात्र, चित्रपटसृष्टीत काही करून दाखवणे हे कुणालाही सहजसोपे नाही. माझ्यावरही दबाव आहेच. मी स्टारकन्या असल्याने इतरांची संधी हिरावून घेतली, असेही कुणी म्हणत असेल. तोंडावर कुणी बोलून दाखवत नाही. मात्र, सोशल मीडियात अशी भडास बाहेर काढली जाते. मात्र, आता मी अशा लोकांसमोरही स्वतःला सिद्ध करून दाखवू इच्छिते. माझे टीकाकारही माझ्यावर प्रेम करतील, असे मला वाटते. माझ्या आईला अतिशय आदर मिळाला आणि हा आदर कामातूनच कमवावा लागतो. मी तेच करू इच्छिते!